शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीची संधी... महाबीजमध्ये मेगा भरती, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा

By राजेश शेगोकार | Updated: September 2, 2022 17:50 IST

अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ते बोलत होते. 

अकोला: राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामध्ये आगामी काही दिवसात मेगा भरती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ते बोलत होते. 

अकोल्यात राज्याचे मुख्यालय असलेल्या महाबीजची स्थापना २८ एप्रिल १९७६ रोजी झाली असून, बियाणे उत्पादन, प्रमाणिकरण, बियाणे गुणवत्ता नियंत्रण, बियाणे प्रक्रिया, हाताळणी, ‘पॅकेजिंग’, बियाणे विपणन, बियाणे विक्री आदी कामे महाबीजमध्ये होतात. यंदा महाबीजच्या बियाण्यांमध्ये मोठी तूट आढळून आली आहे. तसेच महाबीजमध्ये रिक्त असलेल्या जागांचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. त्यासंदर्भात आता दिलासादायक बाब म्हणजे आगामी दिवसांत लवकर महाबीजमध्ये मेगा भरती राबविण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. यासंदर्भात अकोल्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह युवकांनाही दिलासा मिळणार आहे. 

डॉ. पंजाबराव कृषी विद्यापिठात केली पाहणी

अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापिठातील कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन पाहणी केली.  दरम्यान, सोयाबीनच्या विषयावरून विद्यापीठातील अधिकाऱ्यांना कृषीमंत्र्यांनी चांगलेच खडसावले. तसेच पीडीकेव्ही अंबा या सोयाबीन वाणची जिल्हातील वितरण व लागवडीची आकडेवारी सांगताना अधिकाऱ्यांची भंबेरी उडाल्याचे दिसून आले.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारMahabeejमहाबीजjobनोकरी