शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-बडनेरा रेल्वे मार्गदरम्यान मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची तारांबळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 02:23 IST

अकोला : अकोला-बडनेरा रेल्वे मार्गदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक करण्यात आल्यामुळे अप आणि डाउनकडे धावणार्‍या रेल्वेगाड्या उशिराने धावल्यात. दोन्ही मार्गावरील रेल्वेगाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने सुटल्याने प्रवाशांचे चांगलेचं हाल झालेत. गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि नरखेड-भुसावळ पॅसेंजर या दोन्ही रेल्वेगाड्या अनेक तास उशिराने अकोल्यात पोहोचल्यात.

ठळक मुद्देअहमदाबाद-हावडा, गीतांजली एक्स्प्रेस विलंबाने धावल्या

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला-बडनेरा रेल्वे मार्गदरम्यान रविवारी मेगा ब्लॉक करण्यात आल्यामुळे अप आणि डाउनकडे धावणार्‍या रेल्वेगाड्या उशिराने धावल्यात. दोन्ही मार्गावरील रेल्वेगाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने सुटल्याने प्रवाशांचे चांगलेचं हाल झालेत. गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि नरखेड-भुसावळ पॅसेंजर या दोन्ही रेल्वेगाड्या अनेक तास उशिराने अकोल्यात पोहोचल्यात.कुरूम-माना रेल्वे मार्गावर ब्रिटीशकालीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. या कामांचा भाग म्हणून शनिवारी मेगा ब्लॉक केला गेला. त्यामुळे शनिवारी सकाळी अकोल्यातून जाणार्‍या रेल्वे गाड्यांची गती मंदावली. नागपूरकडे जाणार्‍या रेल्वे गाड्यांची गती मेगा ब्लॉकदरम्यान कमी झाली. त्यात अनेक तासांचा कालावधी लागला.

दरम्यान, रविवारी पहाटे कुरूम रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर ओएचईचे मुख्य तार तुटल्याने नागपूर होत हावडाकडे जाणार्‍या रेल्वेगाड्या अकोला स्थानकावर आणि स्थानकाबाहेरचं थांबविल्या गेल्यात. त्यामुळे अकोल्यात येणारी अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस निर्धारित वेळेपेक्षा अर्धातास उशिराने पोहोचली. त्यानंतर ही गाडी नागपूरकडे उशिराने रवाना झाली. त्यानंतर मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस रवाना झाली. मात्र, पुन्हा ही गाडी मध्येच थांबविली गेली. सोबतच तिरुपती -अमरावती एक्स्प्रेसला देखील बोरगाव मंजू रेल्वेस्थानकाजवळ थांबविण्यात आले. कुरूम रेल्वे स्टेशनचे अधीक्षक जगदीश यादव यांनी तत्परता दाखवून बडनेराच्या ओएचईशी संपर्क साधून तुटलेल्या तार जोडणीसाठी बोलावून घेतले.

प्रवाशांचे हाल-बेहाल४अकोला रेल्वे स्थानकाहून सुटल्यानंतर अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस आणि मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस आणि तिरूपती-अमरावती एक्स्प्रेसला मध्येच थांबविण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झालेत. पाणी आणि खाद्य पदार्थदेखील विकत घेता आले नाही. 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीMurtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला