शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका सीमा विस्तार भागातील पाणी समस्येवर बैठक

By admin | Updated: April 6, 2017 01:47 IST

अकोला : महापालिका सीमा विस्तार झालेल्या मलकापूर, शिवणी, शिवर, उमरी, भौरद, डाबकी आदी परिसरात पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली असून, त्याचा प्रत्यय पहिल्याच आमसभेत अनुभवास आला.

अकोला : महापालिका सीमा विस्तार झालेल्या मलकापूर, शिवणी, शिवर, उमरी, भौरद, डाबकी आदी परिसरात पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली असून, त्याचा प्रत्यय पहिल्याच आमसभेत अनुभवास आला. त्यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी महापालिका आयुक्त विजय अग्रवाल यांनी बैठक बोलाविली. या बैठकीला विस्तारित झालेल्या परिसरातील नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते. सोबतच मनपा उपायुक्त समाधान सोळंके, नगर सचिव अनिल बिडवे, शहर अभियंता सुरेश हुंगे प्रामुख्याने उपस्थित होते.महापालिकेत समाविष्ट झालेल्या परिसरातील पाणीपुरवठा समस्या सोडविण्यासाठी खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर यांच्या विकास निधीतून पाणीपुरवठ्याची विकास कामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन याप्रसंगी महापौर विजय अग्रवाल यांनी दिले. शिवसेना नगरसेवक मंगेश काळे यांनी कुंभारीचा पाणीपुरवठा बंद करून महानचा पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी येथे केली. घाणेरडे आणि दूषित पाणी येत असल्याची नागरिकांची तक्रार असल्याचेही त्यांनी येथे सांगितले. महानगरात आलेल्या सर्व नवीन परिसरातील पाणीपुरवठा पाइपलाइनची दुरुस्ती आणि सेवा नियमित केल्या जाईल, असेही महापौर विजय अग्रवाल यांनी बैठकीत सांगितले.