शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

३१० कोटींच्या आराखड्यावर मुंबईत बैठक

By admin | Updated: July 11, 2017 01:04 IST

अकोला : महापालिका क्षेत्राची हद्दवाढ होऊन शहरात समाविष्ट झालेल्या नवीन प्रभागात विकास कामे करण्यासाठी ३१० कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका क्षेत्राची हद्दवाढ होऊन शहरात समाविष्ट झालेल्या नवीन प्रभागात विकास कामे करण्यासाठी ३१० कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला. नवीन प्रभागात नेमक्या कोणत्या कामांची गरज आहे, यासह विविध मुद्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी उद्या (मंगळवार) बैठकीचे आयोजन केले आहे. मनपा आयुक्त अजय लहाने सोमवारी मुंबईकडे रवाना झाले. शहरालगतच्या २४ गावांचा मनपा प्रशासनाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांवर ताण पडत होता. यामध्ये रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा आदी बाबींचा समावेश होता. त्यामुळे मनपा क्षेत्राची हद्दवाढ करणे गरजेचे असल्याचा मुद्दा लोकप्रतिनिधींनी शासनाकडे लावून धरला. महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी हद्दवाढीचा सुधारित प्रस्ताव पाठवल्यानंतर शहरालगतच्या प्रमुख १३ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या २४ गावांचे मनपामध्ये विलिनीकरणास शासनाने मंजुरी दिली. या नवीन प्रभागात मूलभूत सोयी-सुविधाची दाणादान उडाल्याचे चित्र आहे. त्या पृष्ठभूमीवर सत्ताधाऱ्यांनी ३१० कोटींच्या विकास आराखड्याचा प्रस्ताव मंजूर केला. प्रशासनाने हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून, त्यासंदर्भात ११ जुलै रोजी नगर विकास विभागात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.