शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बंद उपकरणांमुळे वैद्यकीय तपासण्या खोळंबल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 13:51 IST

रुग्णांना खासगी दवाखान्यांमध्ये दाखविण्याचा सल्ला दिला जात असल्याचे वास्तव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत काही दिवसांपासून सर्वोपचार रुग्णालयातील महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे बंद पडल्याने शेकडो रुग्णांच्या वैद्यकीय तपासण्या खोळंबल्या आहेत. सुविधा उपलब्ध नसल्याने बहुतांश रुग्णांना खासगी दवाखान्यांमध्ये दाखविण्याचा सल्ला दिला जात असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या मदतीने जिल्ह्यातील गरीब रुग्णांना प्रभावी उपचार मिळावा, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आहेत; परंतु गत काही दिवसांपासून यातील महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे लागोपाठ बंद पडत आहेत. सोनोग्राफी, डायलिसिस, ईईजीनंतर आता सीटी स्कॅन मशीनही बंद पडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची मोठी पंचाईत झाली आहे. येथे डॉक्टरांकडून उपचार तर होतो; परंतु सीटी स्कॅन, डायलिसिस, सोनोग्राफीसारख्या वैद्यकीय तपासण्यांसाठी रुग्णांना खासगीत रेफर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. रुग्णांना महागड्या वैद्यकीय तपासण्या खासगीत कराव्या लागत असल्याने आर्थिक फटका बसत आहे.

औषधीही घ्यावी लागताहेत विकतवैद्यकीय उपकरणांमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने महत्त्वाच्या सेवा बंद पडल्या आहेत. दुसरीकडे सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना औषधी खासगी मेडिकलवरून खरेदी करावी लागत आहेत. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे गरिबांचा उपचार महागला आहे.

तांत्रिक कारणांमुळे वैद्यकीय उपकरणांमध्ये बिघाड आला आहे. त्याच्या दुरुस्तीचे प्रयत्न सुरू असून, दोन वैद्यकीय उपकरणांची हापकीनकडे मागणी करण्यात आली आहे. लवकरच वैद्यकीय यंत्रणा पूर्ववत सुरू होईल.- डॉ. शिवहरी घोरपडे,अधिष्ठाता, जीएमसी, अकोला.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय