शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

'आॅटोडीसीआर’साठी आता महाआयटी विभागाची यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 13:11 IST

अकोला : राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांनी त्यांच्या स्तरावर इमारत, घरे बांधण्याकरिता नकाशा मंजुरीसाठी आॅटोडीसीआर प्रणाली कार्यान्वित करीत खासगी कंपन्यांना कंत्राट दिला.

ठळक मुद्देनगररचना विभागाकडे नकाशा मंजुरीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर पहिल्यांदा जोत्यापर्यंत (प्लिंथ) बांधकामाची परवानगी दिली जाते.जोत्यापर्यंत बांधकाम पूर्ण केल्यावर पुढील बांधकामासाठी पुन्हा नगररचना विभागाची परवानगी आवश्यक ठरते.आॅटोडीसीआर प्रणालीनुसार नकाशा मंजूर केल्यानंतर प्रस्ताव नगररचना विभागाकडे सादर केला जातो.

-  आशिष गावंडे

अकोला : राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांनी त्यांच्या स्तरावर इमारत, घरे बांधण्याकरिता नकाशा मंजुरीसाठी आॅटोडीसीआर प्रणाली कार्यान्वित करीत खासगी कंपन्यांना कंत्राट दिला. या प्रणाली अंतर्गत नकाशा मंजूर केल्यानंतर नगररचना विभागाकडून अंतिम मंजुरी दिली जात असली, तरी प्रणालीतील त्रुटींमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र होते. ही बाब ध्यानात घेता माहिती व तंत्रज्ञान विभागाने खासगी कंपन्यांचे कंत्राट रद्द करण्यासह शासनाच्या महाआयटी विभागाची यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश नगर विकास विभागाने दिले आहेत.शहरात व्यावसायिक संकुल, रहिवासी इमारती किंवा घरे बांधण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडून नकाशा मंजूर करावा लागतो. नगररचना विभागाकडे नकाशा मंजुरीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर पहिल्यांदा जोत्यापर्यंत (प्लिंथ) बांधकामाची परवानगी दिली जाते. जोत्यापर्यंत बांधकाम पूर्ण केल्यावर पुढील बांधकामासाठी पुन्हा नगररचना विभागाची परवानगी आवश्यक ठरते. यादरम्यान, नकाशा सादर करताना प्लॉटचे क्षेत्रफळ, कृषक-अकृषक असण्यासोबतच शिट क्रमांक आदी इत्थंभूत माहिती कागदोपत्री सादर करावी लागत होती. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे ‘ड’ वर्ग महापालिकांनी नकाशा मंजुरीसाठी आॅटोडीसीआर प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. आॅटोडीसीआर पद्धतीनुसार मालमत्ताधारकाला आर्किटेक्टच्या सहाय्याने आॅनलाइन अर्ज सादर करणे भाग आहे. त्यासाठी महापालिकांनी रीतसर आर्किटेक्ट, अभियंत्यांची निवड केली. अकोला महापालिका प्रशासनाने आॅटोडीसीआरचा कंत्राट पुणे येथील इन्फोटेक कंपनीला दिला आहे. ही प्रणाली कार्यान्वित केल्यानंतर नकाशा मंजुरीची कामे झटपट निकाली निघतील, अशी अपेक्षा होती. आॅटोडीसीआर प्रणालीनुसार नकाशा मंजूर केल्यानंतर प्रस्ताव नगररचना विभागाकडे सादर केला जातो. या विभागाकडून नकाशात काही त्रुटी असल्यास त्या दूर केल्या जातात. ही सर्व प्रक्रिया वेळखाऊ व खर्चिक असल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची परिस्थिती आहे. अर्थात, कोणताही नकाशा आॅटोडीसीआर प्रणालीद्वारे मंजूर होत असेल, तर त्यामध्ये त्रुटी निघण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचा तार्कीक मुद्दा उपस्थित झाला होता.

अखेर शासनाने घेतली दखलखासगी कंपन्यांनी तयार केलेली आॅटोडीसीआरची यंत्रणा सदोष असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अखेर शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने महाआयटी विभागामार्फत ‘पोर्टल’ तयार केले. या माध्यमातून ‘वन बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट’ प्रणाली तयार करण्यात आली. या प्रणाली अंतर्गत स्थानिक आर्किटेक्टची नोंदणी करण्याचे निर्देश ‘ड’ वर्ग महापालिकांना देण्यात आले आहेत. खासगी कंपन्यांचे कंत्राट तातडीने रद्द करण्याची सूचना शासनाने केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका