शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

एमसीएक्स-एनसीडीएक्सवर डब्बा ट्रेडिंगचा सट्टाबाजार

By admin | Updated: March 28, 2017 01:44 IST

तेल, ढेप, धान्य आणि किराणावर होत असलेल्या या सट्टाबाजाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष

संजय खांडेकरअकोला, दि. २७- मल्टी कॉमोडिटी एक्स्चेंज आणि नॅशनल कॉमोडिटी डेरिव्हेटिव्हज एक्स्चेंजच्या बाजारपेठेच्या दैनंदिन चढ-उतारावर अकोल्यात डब्बा ट्रेडिंगचा सट्टाबाजार जोरात खेळला जात आहे. तेल, ढेप, धान्य आणि किराणावर होत असलेल्या या सट्टाबाजाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. विशेष म्हणजे नागपूरमध्ये अशा प्रकारे डब्बा ट्रेडिंग करणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई करून कोट्यवधीचा सट्टाबाजार उजेडात आणला. त्यामुळे नागपूरच्या धर्तीवर अकोल्यात कारवाई झाली तर मोठे जाळे उजेडात येण्याची शक्यता आहे.सुरुवातीपासून अकोल्यात डब्बा ट्रेडिंगच्या सट्टाबाजारात मोठी उलाढाल होती ; मात्र मध्यंतरी पोलिसांनी अकोट आणि अकोल्यातील सटोडियांवर कठोर कारवाई केल्याने जिल्हाभरातील क्रिकेट सटोडियांचे धाबे दणाणले. त्यामुळे अनेक किक्रेट सटोडियांनी आपले सट्टाबाजाराचे बिर्‍हाड क्रिकेटवरून एमसीएक्स-एनसीडीएक्स हलविले. गत काही महिन्यांपासून हा डब्बा ट्रेडिंगचा बाजार तेजीत आहे. एमसीएक्स-एनसीडीएक्सवर होत असलेले चढ-उताराचे दर यावर अकोल्यातील २0 ब्रोकर उतारे घेतात. यासाठी एमसीएक्स-एनसीडीएक्ससारखे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. सट्टाबाजारासारखी खायवाडी दररोज डब्बा ट्रेडिंगमध्ये चालते. यातील बहुतांश व्यवहार हा सिक्युरिटी ट्रान्जेक्शन टॅक्सशिवाय होतो. सोबतच इन्कम टॅक्सही बुडविला जातो. डब्बा ट्रेडिंगचे किंगफीन अकोल्यातीलच असल्याने त्याचा बोभाटा होत नाही. कमी मार्जीनवर कॉमोडिटीत व्यवसाय करणारे बहुतांश व्यापारी डब्बा ट्रेडिंगमध्ये गुंतलेले असण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी क्रिकेट सटोडियांसारखा अंकुश जर या डब्बा ट्रेडिंग करणार्‍या व्यापार्‍यांवर लावला तर अकोल्यातील मोठा सट्टाबाजार बंद तर होईलच, यासोबत करबुडवेदेखील समोर येतील.