शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

गणिताच्या पेपरला तब्बल २0 कॉपीबहाद्दर निलंबित

By admin | Updated: March 11, 2016 03:07 IST

अकोला जिल्ह्यातील एकाच केंद्रावर १७ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले.

अकोला: इयत्ता दहावीच्या गणित विषयाच्या पेपरदरम्यान शिक्षण विभागाच्या भरारी पथकांनी घातलेल्या धाडीत तब्बल २0 कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना गुरूवारी निलंबित करण्यात आले. किनखेड पूर्णा येथील संत तुकाराम विद्यालय परीक्षा केंद्रावर सर्वाधिक १७ विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यामुळे येथील केंद्र संचालक व पर्यवेक्षकांवर कारवाई करण्यासंदर्भातील अहवाल अमरावती विभागीय शिक्षण मंडळाकडे पाठविण्यात आला आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. या पृष्ठभूमिवर शासनस्तरावर कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असले, तरी त्याला विद्यार्थ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे परीक्षेदरम्यान दिसून येत आहे. शिक्षण विभागाच्या भरारी पथकांनी केलेल्या कारवाईदरम्यान जिल्हय़ातील विविध परीक्षा केंद्रांवर आतापर्यंंत ३७ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले. सातत्याने कारवाई होत असतानासुद्धा अनेक परीक्षा केंद्रांवर कॉपी करण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे दिसून येत आहेत. गुरुवारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांंच्या भरारी पथकाने दर्यापूर मार्गावरील किनखेड पूर्णा येथील संत तुकाराम विद्यालय परीक्षा केंद्रावर धाड घालून १७ विद्यार्थ्यांंना कॉपी करताना पकडले. याच पथकाने दहीहांडा येथील रूपनाथ विद्यालय परीक्षा केंद्रावर धाड घालून २ विद्यार्थ्यांंना निलंबित केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या भरारी पथकाने कानशिवणी येथील तुकाराम इंगोले विद्यालय येथे धाड घालून एका विद्यार्थ्यांंस निलंबित केले. शनिवारी दहावीचा विज्ञान (१) विषयाचा पेपर आहे. याही पेपरला भरारी पथकांचा परीक्षा केंद्रावर वॉच राहणार आहे.