अकोला : सर्वसाधारण नागरिकांसह गर्भवतीमध्येही कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील प्रसूती विभाग हा कोरोनाबाधित गर्भवतींसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय जीएमसी प्रशासनाने घेतला आहे.सर्वोपचार रुग्णालय हे कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे येथील अत्यावश्यक रुग्ण वगळता इतर रुग्णांची गर्दी कमी केली आहे. शिवाय, येथे प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवतीलाही जिल्हा स्त्री रुग्णालयात वळते केले जात आहे. दुसरीकडे जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘कंटेनमेन्ट झोन’मधून येणाºया गर्भवतीवर विशेष लक्ष दिले जात आहे, अशा गर्भवतींसाठी रुग्णालयात स्वतंत्र वॉर्डाची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘कंटेनमेन्ट झोन’मधून येणाºया गर्भवतींचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यास त्यांना थेट सर्वोपचार रुग्णालयात हलविले जात आहे. त्यामुळे गर्भवतींना असलेला कोरोना संसर्गाचा धोका टाळणे सोयीचे जात आहे.
‘जीएमसी’तील प्रसूती विभाग ‘कोविड’साठी राखीव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 18:06 IST