शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांद्वारे होत आहे ‘मास्क’ची निर्मिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 14:04 IST

जिल्हा मध्यवर्ती कारागृहांमध्ये कैद्यांकडून मास्कची निर्मिती करून घेण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात आगामी पंधरा दिवस ‘कोरोना’चे संकट आहे. त्यावर मात करण्यासाठी सर्वच स्तरातून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाचा संभाव्य धोका पाहता राज्यभरातील सर्वच जिल्हा मध्यवर्ती कारागृहांमध्ये कैद्यांकडून मास्कची निर्मिती करून घेण्यात येत आहे.राज्यात सर्वत्र कोरोनाचे संकट आहे. त्यावर मात करण्यासाठी राज्यभरात प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. शिवाय, आगामी काळातील स्थिती पाहता वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही मास्कचा तुटवडा भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्यंतरी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारागृहातील कैद्यांद्वारे मास्क निर्मितीची संकल्पना मांडली होती.त्यांच्या या संकल्पनेला प्रतिसाद देत राज्यभरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांद्वारे मास्क निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे.मास्क निर्मिती करताना कैद्यांकडून स्वच्छतादेखील पाळण्यात येत आहे. शिवाय, सर्वसाधारण विषाणूंचादेखील एकापासून दुसºयाला संसर्ग होऊ नये, यासाठी तेदेखील मास्क लावूनच काम करीत असल्याचे चित्र जिल्हा कारागृहात दिसून येते.‘मास्क’चा उपयोग कैदी अन् पोलीस कर्मचाऱ्यांसाठीच! कारागृहात निर्मित मास्कचा उपयोग हा कैद्यांसह कारागृहातील पोलीस कर्मचाºयांसाठीच केला जाणार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला बाहेरून मास्क विकत आणावे लागणार नाहीत.

कोरोनाचा धोका पाहता कारागृहात आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी बाहेरून येताना हात व तोंड स्वच्छ धुवूनच कारागृहात प्रवेश करीत आहेत. कैद्याकडून मास्कची निर्मितीदेखील करण्यात येत आहे. या मास्कचा उपयोग कैद्यांसह पोलीस कर्मचारी करणार आहेत.- ए. एस. सदाफुले, कारागृह अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती कारागृह, अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या