शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:31 IST

अकोला: खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौलखेड येथील रहिवासी एका विवाहितेने सासरच्या मंडळींनी केलेल्या छळापायी आत्महत्या केल्याची घटना २२ मार्च रोजी घडली.

अकोला: खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौलखेड येथील रहिवासी एका विवाहितेने सासरच्या मंडळींनी केलेल्या छळापायी आत्महत्या केल्याची घटना २२ मार्च रोजी घडली असून, पोलिसांनी सदर सासरच्या मंडळीविरुद्ध विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ करणे तसेच तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे; मात्र ही हत्या असल्याचा आरोप करीत मुलीच्या वडिलांनी २६ मार्च रोजी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे.पळसो बढे येथील रहिवासी गणेश शहादेवराव काळे यांची मुलगी आरती हिचा विवाह कौलखेडमधील रहिवासी प्रवीण नागे याच्यासोबतच दोन वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर या दोघांना एक मुलगा झाल्यानंतर तिचा पती प्रवीण नागे, सासरा भास्कर नागे, सासू सुनंदा नागे व प्रवीणची सीमा नामक बहीण माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावत होते. हुंडा कमी दिल्यामुळे दुचाकी घेण्यासाठी आणखी पैशाची मागणी आरतीच्या सासरच्या मंडळींनी सुरू केली होती. हा प्रकार आरतीने तिच्या माहेरी सांगितला; मात्र त्यानंतर त्यांच्यात बैठक होऊन यामधून तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला; मात्र त्यांच्यातील वाद पुन्हा सुरू झाल्याने आरतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती नागे कुटुंबीयांनी काळे यांना मोबाइलवर दिली. आरतीचे वडील व नातेवाईक कौलखेड येथे येईपर्यंत गळफास घेतलेल्या आरतीचा मृतदेह काढून खाली जमिनीवर ठेवण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणात संशय निर्माण होत असून, आरतीचे वडील यांनी पोलीस अधीक्षकांना २६ मार्च रोजी निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या