शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित दाम्पत्याने दुस-यांदा लग्न करून लाटली शासनाची रक्कम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2016 02:04 IST

दाम्पत्याला न्यायालयाने सुनावली सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा.

अकोला, दि. १: आधीच लग्न झालेले. त्यात पुन्हा दुसर्‍यांदा पत्नीसोबतच लग्न करून शासनाच्या योजनेतून दहा हजार रुपयांची रक्कम लाटणार्‍या दाम्पत्याला प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी जय मो. सिंघानिया यांच्या न्यायालयाने बुधवारी सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आणि प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. शहरातील संतोष रामदास सावंत (३२) आणि त्याची पत्नी छाया सावंत (२८) यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे २00४ मध्ये अशोक वाटिकेत विवाह केला. त्याची नोंदणीही त्यांनी केली. २00८ मध्ये बाभुळगाव जहागीर येथील एका सामाजिक संस्थेने सामूहिक विवाह समारंभाचे आयोजन केले होते. विवाह करण्यासाठी शासनाकडून नवदाम्पत्यास प्रोत्साहन योजनेतून दहा हजार रुपयांची मदत दिली जाते. या कारणामुळे विवाहित दाम्पत्याने सामूहिक विवाह सोहळय़ामध्ये सहभागी होऊन दुसर्‍यांदा विवाह करून महिला व बालकल्याण विभागाकडून दहा हजार रुपयांची रक्कम लाटली; परंतु पुढे ही महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी अर्चना इंगोले यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी दामप्त्याविरुद्ध १२ मे २0११ रोजी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केली. त्यानुसार दोन्ही आरोपींविरुद्ध पोलिसांनी भादंवि कलम ४२0, ४६७, ४६८ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपी संतोष सावंत व त्याची पत्नी छाया यांच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने, न्यायालयाने दोघांनाही कलम २४८ प्रमाणे प्रत्येकी सहा महिन्यांचा साधा कारावास आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील एन.एन. काळे यांनी बाजू मांडली.