शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बाजारातील मंदीला नवरात्रीच्या तेजीची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 14:08 IST

अकोला : पितृपक्षात शक्यतोवर खरेदी टाळली जात असल्याने संपूर्ण बाजारपेठेत मंदी आलेली आहे. नवरात्रीचा उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रास-गरब्याची सजावट, गरब्यासाठीचे कपडे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची खरेदी, वाहन खरेदी, सोने खरेदीसाठी ग्राहक बाजारपेठेकडे पुन्हा पलटतील, अशी अपेक्षा बाजारातील दुकानदारांना लागलेली आहे

ठळक मुद्देमंगळवार, ९ आॅक्टोबरच्या सर्वपित्री अमावास्येनंतर प्रतिपदेने घटस्थापना होणार आहे. नवरात्रीनिमित्त बाजारातील मंदी दूर होण्याची अपेक्षा अनेकांना आहे. नवरात्रीपासून तर दिवाळीपर्यंत बाजारात कायम तेजी राहील, असेही बोलले जात आहे.

अकोला : पितृपक्षात शक्यतोवर खरेदी टाळली जात असल्याने संपूर्ण बाजारपेठेत मंदी आलेली आहे. नवरात्रीचा उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रास-गरब्याची सजावट, गरब्यासाठीचे कपडे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची खरेदी, वाहन खरेदी, सोने खरेदीसाठी ग्राहक बाजारपेठेकडे पुन्हा पलटतील, अशी अपेक्षा बाजारातील दुकानदारांना लागलेली आहे. बाजारातील मंदिला नवरात्रीत तेजीची उभारी येईल. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.विविध धार्मिक उत्सवांच्या भोवती आपल्या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था फिरत असते. यातील काही घटक बदलल्याने आणि नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्याने आता समाजावर त्याचा वेगळा परिणाम दिसून येत आहे. नुकताच राज्यात गणेशोत्सव झाला. त्यानिमित्ताने बाजारपेठेत काही प्रमाणात का होईना, तेजी आली होती. मिठाई, फळ, मांडव, रोषणाई, हार, फुले यांच्याभोवती गर्दी दिसली. दरम्यान पितृपक्ष आल्याने ग्राहकांनी पुन्हा बाजारपेठेकडे पाठ फिरविली. त्यामुळे काही दिवसांपासून बाजारात कमालीची मंदी आलेली आहे. मंगळवार, ९ आॅक्टोबरच्या सर्वपित्री अमावास्येनंतर प्रतिपदेने घटस्थापना होणार आहे. नवरात्रीनिमित्त बाजारातील मंदी दूर होण्याची अपेक्षा अनेकांना आहे. नवरात्रीपासून तर दिवाळीपर्यंत बाजारात कायम तेजी राहील, असेही बोलले जात आहे; मात्र डॉलरपुढे भारतीय रुपयांची झालेली घसरण, शेअर बाजार आपटल्याने सोन्यात आलेली उभारी याचादेखील बाजारपेठेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे नेमकी बाजारपेठेची स्थिती काय राहील, याबाबत केवळ अपेक्षा व्यक्त केली जात आहे.आॅनलाइन बाजार तेजीतसर्वच आॅनलाइन कंपन्यांनी खास नवरात्रीनिमित्त पोशाखांची विक्री सुरू केली आहे. ३५० रुपयांपासून तर २,७५० रुपयांपर्यंतचे पोशाख आॅनलाइन विक्रीसाठी उपलब्ध आहे. विशेष सेल बाजार आॅनलाइनवर असल्याने युवा पिढीचा कल त्याकडेच जास्त आहे.*इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठ सज्जनवरात्री आणि दिवाळीनिमित्त बाजारात तेजी येणार असल्याची अपेक्षा ठेवून मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची मागणी आम्ही करून ठेवली आहे. घटस्थापनेपासून हा माल उतारला जाणार आहे. यासाठी अनेक सवलती कंपनीकडून दिल्या जात असून, कर्ज पुरवठा कंपन्यांही तयार आहे, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स वस्तंूची अकोल्यातील वितरक श्रीराम मित्तल यांनी व्यक्त केली.*महिन्यात एक हजाराने सोने वाढले!आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उलाढालीमुळे एका महिन्यात एक हजार रुपयांनी सोने वधारले आहे. त्यामुळे ग्राहक सोन्याकडे फिरकतीलच असे नाही. नवरात्री आणि त्यानंतर येणाऱ्या धनत्रयोदशीला मात्र ग्राहक बाहेर पडतोच, तेव्हा तो सोन्याचे दर पाहत नाही, मुहूर्त पाहतो, असे मत ज्वेलरी संचालक प्रकाश लोडिया यांनी व्यक्त केले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाbusinessव्यवसायMarketबाजार