शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात गर्दी; नियम पायदळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:14 IST

मनपाच्या स्वच्छतागृहांमध्ये सुविधांचा अभाव अकाेला : महापालिकेतील पुरुष व महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध असले तरी, त्यामध्ये सुविधांचा अभाव ...

मनपाच्या स्वच्छतागृहांमध्ये सुविधांचा अभाव

अकाेला : महापालिकेतील पुरुष व महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध असले तरी, त्यामध्ये सुविधांचा अभाव आहे. हात धुण्यासाठी स्वच्छ पाणी नसून अस्वच्छता असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने स्वच्छतागृहांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.

मनपात साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा

अकाेला : काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. अशास्थितीत मनपाकडून अकाेलेकरांना साेशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत सातत्याने आवाहन केले जात असतानाच खुद्द मनपाच्या विविध कार्यालयात कर्मचाऱ्यांकडून साेशल डिस्टन्सिंगला खाे दिल्याचे चित्र बुधवारी पाहावयास मिळाले. याबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे दिसत आहे.

क्षयराेग विभाग वाऱ्यावर

अकाेला : शहरात महापालिकेच्या अखत्यारित मुख्य पाेस्ट ऑफीसच्या बाजूला असलेल्या क्षयराेग विभागाची सुरक्षा रामभराेसे असल्याचे समाेर आले आहे. आवारभिंतीला प्रवेशद्वार नसल्यामुळे ऑटाेचालक, रिक्षाचालक व अनेकदा भिकाऱ्यांचा या परिसरात वावर दिसून येताे. मध्यंतरी या विभागाच्या आवारातील खाेल्यांमधून साहित्य लंपास झाल्याची घटना घडली हाेती.

सिव्हिल लाईन रस्ता ठरताेय जीवघेणा

अकाेला : शहरातील वर्दळीचा असलेल्या नेहरू पार्क चाैक ते सिव्हिल लाईन चाैकापर्यंतच्या सिमेंट रस्त्यावर ठिकठिकाणी तडे गेले आहेत. हा रस्ता निकृष्ट व दर्जाहीन ठरला असून, उघड्या पडलेल्या गिट्टीमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे.

उड्डाणपुलाखालच्या रस्त्यावर खड्डे

अकाेला : शहरात माेठा गाजावाजा करीत उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली. परंतु पुलाच्या दाेन्ही बाजूच्या रस्त्याची दुरुस्ती करणे भाग असताना कंत्राटदाराने सपशेल दुर्लक्ष केले आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्यावर खड्डे पडले असून, अपघाताची शक्यता बळावली आहे. याकडे भाजपच्या लाेकप्रतिनीधींनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

मुख्य रस्त्यांवर बेघर नागरिक मुक्कामी

अकाेला : शहरात जिल्हाधिकारी कार्यालयाची आवारभिंत, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्या आवारभिंतीलगत बेघर नागरिकांचे वास्तव्य दिसून येते. याठिकाणी बेघर नागरिक उघड्यावर जेवण तयार करतात. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे. मनपा प्रशासनाने अशा नागरिकांना बेघर निवाऱ्यात ठेवण्याची मागणी हाेत आहे.