शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maratha reservation : सत्ताधारी मराठयांच्या दूर्लक्षामुळेच आरक्षणाच्या मागणीचा उद्रेक़ - अ‍ॅड.आंबेडकरांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 13:09 IST

जे मराठे नेते सत्तेत होते त्यांनीच या मागणीकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले व आता समाज पेटून उठल्यावर आरक्षणाच्या मागणीचे ते समर्थन करीत आहेत असा आरोप भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला.

ठळक मुद्देमराठा नेत्यांची आरक्षणासोबतच बांधीलकीच नव्हती असा आरोप अ‍ॅड.आंबेडकर यांनी केला. आर्थिक निकषांची सध्याच्या संविधानामध्ये राज्यघटनेत तरतुदच नाही त्यामुळे संविधान बदलााशिवाय ते शक्य नाही असेही त्यांनी सांगीतले.वंचीत बहूजन आघाडीच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते.

अकोला -आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आज रस्त्यावर उतरला आहे. आंदोलन तिव्र होत आहे मात्र या आंदोलनाला सत्ताधारी मराठेच जबाबदार आहेत. यापूर्वी जे मराठे नेते सत्तेत होते त्यांनीच या मागणीकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले व आता समाज पेटून उठल्यावर आरक्षणाच्या मागणीचे ते समर्थन करीत आहेत असा आरोप भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला.वंचीत बहूजन आघाडीच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते. आतापर्यत सत्तेची सर्वाधीक पदे मराठा समजाकडे होती, मराठा समाज आरक्षणाची मागणी ही जुनीची मागणी आहे. साधारणपणे १९८१ पासून या मागणीची सुरवात झाली तेव्हांपासून सत्तेत असलेल्या मराठा समाजाच्या नेत्यांनी यामागणीकडे दूर्लक्ष केले. त्या मराठा नेत्यांची आरक्षणासोबतच बांधीलकीच नव्हती असा आरोप अ‍ॅड.आंबेडकर यांनी केला. आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची चर्चा आता नव्याने सुरू झाली आहे. राजकीयदृष्टयाही मागणी केली जात असली तरी आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यासाठी आधी संविधानात बदल करावे लागतील. आर्थिक निकषांची सध्याच्या संविधानामध्ये राज्यघटनेत तरतुदच नाही त्यामुळे संविधान बदलााशिवाय ते शक्य नाही असेही त्यांनी सांगीतले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर