शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation Protest : अकोल्यात खासदार, आमदारांच्या घरासमोर ‘झोपमोड’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 16:05 IST

अकोला : मराठा समाजाला आरक्षण देण्यासोबतच विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवारी अकोल्यात खासदार संजय धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानासमोर झोपमोड आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देखासदार संजय धोत्रे, आमदार (अकोला पूर्व)रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानासमोर शुक्रवारी सकाळी झोपमोड आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी ‘गोंधळ’ घालून  मराठा आरक्षण देण्याची मागणी केली.

अकोला : मराठा समाजाला आरक्षण देण्यासोबतच विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवारी अकोल्यात खासदार संजय धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानासमोर झोपमोड आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी ‘गोंधळ’ घालून  मराठा आरक्षण देण्याची मागणी केली.मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा क्रांती मोर्चाच्या पुकारलेल्या आंदोलनाची धग राज्यभरात धुमसत आहे. गोदावरीत काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतल्यानंतर संपूर्ण राज्यात आंदोलनाने पेट घेतल्याचे दिसून आले. २५ जुलै रोजी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला जिल्हावासीयांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिल्याचे चित्र होते. बंददरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मराठ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्र्यांना जिल्हा बंदी करण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यानंतर आता मराठा क्रांती मोर्चाने त्यांचा रोख जिल्ह्यातील मराठा समाजाचे खासदार, मंत्री, आमदार यांच्याकडे वळविला आहे. समाजाच्या लोकप्रतिनिधींनी आरक्षणाच्या मुद्यावर शासनाकडे ठोस भूमिका मांडण्यासाठी क्रांती मोर्चा आग्रही आहे. त्या धर्तीवर लोकप्रतिनिधींना झोपेतून जागे करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चातील समन्वयक व कार्यकर्त्यांनी खासदार संजय धोत्रे, आमदार (अकोला पूर्व)रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानासमोर शुक्रवारी सकाळी झोपमोड आंदोलन केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाMaratha Reservationमराठा आरक्षणSanjay Dhotreसंजय धोत्रेMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा