लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे ९ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले असून, त्या पृष्ठभूमीवर अकोल्यात ६ ऑगस्ट (रविवार) रोजी मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मराठा समाजबांधवांनी मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन केले जात असून, शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज-बॅनर झळकल्याचे दिसून येत आहे. मुंबई येथील मोर्चात सहभागी होण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. गावपातळीवर प्रचार आणि जनजागृती करण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले जात आहे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्यांच्या स्तरावर बैठकांचे नियोजन केले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रचार व प्रसार केला जात आहे. कोपर्डी प्रकरणाचा निकाल जलदगतीने होऊन दोषींना फाशीची शिक्षा करणे, अँट्रासिटी कायद्याचा गैरवापर लक्षात घेता त्यामध्ये दुरुस्ती करण्याची मराठा समाजाची मागणी आहे. दरम्यान मराठा समाजाच्यावतीने रविवारी जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथून मोटारसायकल रॅली काढण्यात येईल. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत पुन्हा याच ठिकाणी रॅली पोहोचणार आहे. रॅलीमध्ये युवक-युवतींनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा क्रांती मोर्चा; उद्या मोटारसायकल रॅली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:52 IST
अकोला : मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे ९ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले असून, त्या पृष्ठभूमीवर अकोल्यात ६ ऑगस्ट (रविवार) रोजी मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मराठा समाजबांधवांनी मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन केले जात असून, शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज-बॅनर झळकल्याचे दिसून येत आहे.
मराठा क्रांती मोर्चा; उद्या मोटारसायकल रॅली!
ठळक मुद्देशहरात झळकले होर्डिंग्ज-बॅनर