अकोला: मराठा आरक्षणाची घोषणा तातडीने करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाज अकोला जिल्हा शाखेच्यावतीने बुधवार, २५ जुलै रोजी शहरासह जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनास अकोला शहरासह जिल्हाभरात प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील तालुक्याची शहरे व मोठ्या गावांमध्ये व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता-रोको आंदोलन केले. तर राष्ट्रीय महामार्गावर कार्यकर्त्यांनी टायर पेटवून वाहतुक अवरुद्ध करण्याचा प्रयत्न केला. सकल मराठा समाज अकोला जिल्हा शाखेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी अकोला शहरातून मोटारसायकल रॅली काढून बंद पाळण्याचे आवाहन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या ‘एक मराठा-लाख मराठा’, ‘जय शिवाजी-जय भवानी’च्या जयघोषाने शहर दणाणून गेले होते. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांवर मात्र बंदचा परिणाम दिसून आला नाही. बहुतांश मार्गांवरील बसगाड्या सुरु असल्याचे दिसून आले.
Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षण आंदोलनाची अकोल्यात धग; जिल्हा बंदला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 12:44 IST
अकोला: मराठा आरक्षणाची घोषणा तातडीने करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाज अकोला जिल्हा शाखेच्यावतीने बुधवार, २५ जुलै रोजी शहरासह जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षण आंदोलनाची अकोल्यात धग; जिल्हा बंदला प्रतिसाद
ठळक मुद्दे या आवाहनास अकोला शहरासह जिल्हाभरात प्रतिसाद मिळाला आहे. तालुक्याची शहरे व मोठ्या गावांमध्ये व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे.सकाळी अकोला शहरातून मोटारसायकल रॅली काढून बंद पाळण्याचे आवाहन केले.