शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हयात १८ रोजगार मेळाव्यातून अनेक युवकांना मिळाला रोजगार

By atul.jaiswal | Updated: November 15, 2017 13:12 IST

अकोला: महाविद्यालयीन शिक्षणानंतर युवकांना ध्यास लागतो तो नोकरीचा. आजच्या स्पर्धेच्या युगात रोजगार प्राप्तीसाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. असा असंख्य तरुणांचा अनुभव आहे. त्यातही आपली आवड निवड, आपल्यातील कला गुणांना वाव देण्यास योग्य संधी मिळावी असा रोजगार प्राप्त करण्याचे स्वप्न अनेकयुवक युवती आपल्या उराशी बाळगतात. बेरोजगारीच्या या समस्येवर उपाय म्हणून ...

ठळक मुद्देकौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाचा उपक्रम जिल्हापातळीवर रोजगार निर्मिती

अकोला: महाविद्यालयीन शिक्षणानंतर युवकांना ध्यास लागतो तो नोकरीचा. आजच्या स्पर्धेच्या युगात रोजगार प्राप्तीसाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. असा असंख्य तरुणांचा अनुभव आहे. त्यातही आपली आवड निवड, आपल्यातील कला गुणांना वाव देण्यास योग्य संधी मिळावी असा रोजगार प्राप्त करण्याचे स्वप्न अनेकयुवक युवती आपल्या उराशी बाळगतात. बेरोजगारीच्या या समस्येवर उपाय म्हणून राज्यशासनाच्या वतीने जिल्हा पातळीवर रोजगार निर्मिती उपलब्ध केले आहे. अकोला जिल्हयात १८ रोजगार मेळावे झाले असून, त्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत.स्वयंरोजगाराच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिने सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत विभागीय स्तरावर एक आणि जिल्हा स्तरावर चार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते.योग्य अभ्यासक्रम, शिक्षण आणि प्रशिक्षीत शिक्षकांवर यात अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या मेळाव्यांमध्ये उद्योजक व नोकरी उत्सुक उमेदवारांना एका छताखाली आणून उद्योजकांना आवश्यक मनुष्यबळ विनामुल्य उपलब्ध करुन देणे व नोकरी उत्सुक उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी सहाय्य करण्यात येते. यासाठी आॅनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. योग्य प्रशिक्षण व पसंतीशिवाय स्वयंरोजगारासाठी सामान्यपणे कोणतीही व्यक्ती सहसा प्रवृत्त होत नाही.परंतु या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातुन युवकांना आपल्या पसंतीच्या ठिकाणी सेवा देण्याची, उत्कृष्ट प्रशिक्षण प्राप्त करण्याची संधी उपलब्ध होते. समाजात स्वयंरोजगाराबाबत अनुकुल बदल व राष्ट्राचा विकास कौशल्ययुक्त प्रशिक्षणातुनच शक्य आहे.

अमरावती विभागात ९६ रोजगार मेळावेअमरावती विभागात अमरावती २९, अकोला १८, बुलडाणा १७, यवतमाळ १९ व वाशिम १३ अशा ९६ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत वीस हजार युवकांची प्राथमिक स्तरावर निवड करण्यात आली आहे.

टॅग्स :jobनोकरी