शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

महिला व बालकल्याण सभापतीपदी मनीषा भंसाली अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 13:21 IST

अकोला: मनपातील महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी भाजपच्या नगरसेविका मनीषा भंसाली यांची अविरोध निवड झाली.

अकोला: मनपातील महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी भाजपच्या नगरसेविका मनीषा भंसाली यांची अविरोध निवड झाली. याव्यतिरिक्त झोन समिती सभापतींचीही निवड करण्यात आली.महिला व बालकल्याण समितीचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे २१ जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत समितीचे पुनर्गठन करण्यात आले. समितीमधील नऊपैकी आठ सदस्यांची निवड केल्यानंतर सभापती पदाच्या निवडीसाठी गुरुवारी महापालिकेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर उपस्थित होते. महिला व बालकल्याण सभापती पदासाठी भाजपच्यावतीने एकमेव मनीषा भंसाली यांचा अर्ज प्राप्त झाला. तसेच उपसभापती पदासाठी नगरसेविका जान्हवी डोंगरे यांचा अर्ज प्राप्त होता. प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज नसल्यामुळे मनीषा भंसाली व जान्हवी डोंगरे यांची अविरोध निवड करण्यात आली. यासोबतच झोन समितीच्या सभापतींचीही अविरोध निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी आयुक्त संजय कापडणीस, नगरसचिव अनिल बिडवे यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी, महापौर विजय अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.महिला व बालकल्याण समितीमध्ये यांचा समावेशमहिला व बालकल्याण समितीमध्ये काँग्रेसने सदस्य पदासाठी नाव न दिल्यामुळे नऊपैकी आठ महिला सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये मनीषा भंसाली, सुनीता अग्रवाल, जान्हवी डोंगरे, मंगला म्हैसने, सोनी आहुजा, अनुराधा नावकार, उषा विरक व प्रमिला गीते यांचा समावेश आहे.शिवसेनेला कोणते स्थान?निधी वाटपाच्या मुद्यावर ८ जुलै रोजी भाजप व शिवसेनेची बैठक पार पडली होती. या बैठकीत केंद्रात व राज्यात भाजप-सेना युतीचे गोडवे गात सेना नगरसेवकांना समान निधी देण्यावर एकमत झाल्याची चर्चा होती. अर्थात, दोन्ही पक्षाकडून युतीची सबब पुढे केली जात असेल तर महिला व बालकल्याण समितीचे सभापती पद, उपसभापती पद तर सोडाच शिवसेनेच्या वाटेला साधे झोन समितीचे सभापती पदही न आल्यामुळे मनपाच्या राजकारणात शिवसेनेचे नेमके कोणते स्थान आहे, असा सवाल शिवसैनिक उपस्थित करू लागले आहेत. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका