शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा नातेवाईक असल्याची बतावणी क रून तक्रार करणारा तोतया अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 17:39 IST

विराज शहा असे या आरोपीचे नाव असून, त्याने अकोला रेल्वे पोलिसांसह वर्धा येथेही १० महिन्यांपूर्वी तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.

अकोला - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नातेवाईक असल्याची बतावणी करून रेल्वे प्रवासादरम्यान बॅग चोरी गेल्याच्या खोट्या तक्रारी करणाऱ्या गुजरात येथील युवकास रेल्वे पोलिसांनी अटक केली. विराज शहा असे या आरोपीचे नाव असून, त्याने अकोला रेल्वे पोलिसांसह वर्धा येथेही १० महिन्यांपूर्वी तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.गुजरातमधील अहमदाबाद येथील सॅटेलाईट परिसरातील रहिवासी विराज अश्वीन शाह याने जीआरपी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तो १२८३३ हावडा अहमदाबाद एक्स्प्रेसने प्रवास करीत असताना त्याच्याकडील बॅग चोरट्याने अकोला रेल्वे स्थानकावरून पळविली होती. या बॅगमध्ये एक लाख ९० हजार रुपयांचा लॅपटॉप, अ‍ॅपल कंपनीचा मोबाइल एक लाख १० हजार रुपये, १६ हजार ५०० रुपये रोख यांसह मतदान कार्ड, एटीएम व काही दस्तावेज चोरी गेल्याचे तक्रारीत नमूद केले होते; दरम्यान रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली, तसेच संपूर्ण घटनेचा बारकाईने तपास केल्यानंतर अशा प्रकारची चोरीच झाली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तक्रारदार विराज शहा याला अहमदाबाद येथून ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, हा युवक खोट्या तक्रारी करीत असल्याचे उघड झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाच नातेवाईक असल्याचे सांगत असल्याने पोलिसांवरही दबाव टाकण्याचा तो प्रयत्न करीत असल्याचे समोर येत असून, त्याने वर्धा येथेही अशाच प्रकारची खोटी तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी