शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पतंगाच्या मांज्यामुळे गळा कापून दुचाकीस्वार जखमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 10:38 IST

Akola News मांजा मानेला अडकताच, त्यांनी दुचाकी गाडी झुकवून दुपट्ट्याने मांजा खाली ओढला.

ठळक मुद्देवाडेगाव येथील सुनील श्यामराव मानकर हे कामानिमित्त अकोला गेले होते. मांजा सुनील मानकर यांच्या गळ्यात अडकला आणि त्यांचा मांजाने गळा कापला गेला.

वाडेगाव: येथील दुचाकीस्वार अकोलावरून वाडेगावकडे येत असताना पतंगाच्या मांज्यामुळे अचानक गळा कापल्यामुळे दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाडेगाव येथील सुनील श्यामराव मानकर हे कामानिमित्त अकोला गेले होते. घरी परत येत असताना, अकोला बायपास परिसरात पतंगाचा चायना मांजा सुनील मानकर यांच्या गळ्यात अडकला आणि त्यांचा मांजाने गळा कापला गेला. यात ते जखमी झाले. हा पतंग मांजा मानेला अडकताच, त्यांनी दुचाकी गाडी झुकवून दुपट्ट्याने मांजा खाली ओढला. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. या चायना मांज्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होऊन नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. एकीकडे चायना मांज्यावर बंदी असतानासुद्धा पतंग उडविण्यासाठी चायना मांज्याचा वापर होत आहे.

टॅग्स :Akolaअकोलाkiteपतंग