शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

एसटीतून १८ लाखांचे दागिने लंपास करणाऱ्या आराेपीला बेड्या

By आशीष गावंडे | Updated: February 21, 2024 21:41 IST

हरियाणातून केली अटक; ‘एसपी’ बच्चन सिंह यांची माहिती

आशिष गावंडे/ अकोला: लग्नासाठी एसटीतून छत्रपती संभाजीनगर येथे जाणाऱ्या प्रवाशाच्या बॅगेतून सुमारे १६.५० लाखांचे दागिने व राेख दिड लाख रुपये लंपास करणाऱ्या हरियाणातील आराेपीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी एका आराेपीला हरियाणातून बेड्या ठाेकत त्याच्याकडून साेन्याचे सर्व दागिने व राेख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती बुधवारी जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

अमीत पिता बिजेंद्र (३४)रा. रूरकी ता. जि. रोहतक, हरियाणा असे अटक केलेल्या आराेपीचे नाव आहे. उमरी परिसरातील फिर्यादी सतीष बाबुराव गंगाळे (६०)हे १० फेब्रुवारी राेजी त्यांच्या पत्नीसह लग्नकार्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जाण्याकरीता मध्यवर्ती बस स्थानकातून एसटी बसने निघाले हाेते. यावेळी मदत करण्याच्या बहाण्याने आराेपीने गंगाळे यांच्या हातातील बॅग घेऊन त्यातून साेन्याचे दागिने व राेख रक्कम लंपास केली हाेती. याप्रकरणी सिव्हील लाइन पाेलिस ठाण्यात अज्ञात आराेपींविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक शंकर शेळके यांना निर्देश दिले हाेते. शेळके यांनी १३ फेब्रुवारी राेजी पो.उप. नि. गोपाल जाधव, पो.हे.कॉ. खुशाल नेमाडे, पो.कॉ. वसिमोद्दीन, पो.कॉ. मोहम्मद आमीर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचे पथक तपासाकरीता रवाना केले. दरम्यान, अवघ्या दहा दिवसात या चाेरीचा छडा लावून आराेपीला अटक केल्याची माहिती ‘एसपी’ बच्चन सिंह यांनी दिली. 

किसान आंदाेलनामुळे रस्ते बंद‘एलसीबी’ने वाशिम बायपास चाैक परिसर व इतर ठिकाणचे ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे तपासले. तपासाअंती यातील आराेपी हा हरियाणा येथील रोहतक  येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने एक पथक हरियाणा येथे रवाना झाले होते. हा परिसर दिल्ली, हरियाणा, पंजाबचा सिमावर्ती भाग असल्याने व तेथे सुरू असलेल्या किसान आंदोलनामुळे पाेलिसांना बंद रस्त्यांसह मोबाईल नेटवर्कच्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. 

साेन्याचे दागिने,रक्कम जप्तपाेलिसांनी हरियाणा येथील खबऱ्यांच्या नेटवर्कचा वापर केला. त्यातून अमीत पिता बिजेंद्र हाच आराेपी असल्याचे समाेर येताच त्याला शिताफीने अटक केली. आराेपीकडून २७५ ग्रॅम सोन्याचे दागिने अंदाजे किंमत १६ लाख ५० हजार रूपये व नगदी दिड लाख रूपये असा एकुण १८ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी