शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘ईव्हीएम’ विरोधात लढ्याचा संकल्प करा - प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 13:34 IST

अकोला: येणाऱ्या निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) नको, ‘बॅलेट पेपर’ हवे असे सांगत, ‘ईव्हीएम’ विरोधात लढ्याचा संकल्प करण्याचे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केले.

ठळक मुद्देकोला क्रिकेट क्लब मैदान येथे आयोजित धम्म मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. मानवतेची ही व्यवस्था राहील की नाही, याबाबतचा फैसला २०१९ ची सार्वत्रिक निवड ठरवणार असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.मताचा अधिकार या शस्त्राच्या आधारेच मोदी सरकारचा पराभव केला पाहिजे, असेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले.

अकोला: येणाऱ्या निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) नको, ‘बॅलेट पेपर’ हवे असे सांगत, ‘ईव्हीएम’ विरोधात लढ्याचा संकल्प करण्याचे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केले.धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा शाखेच्यावतीने अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे आयोजित धम्म मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र दारोकार गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अंजली आंबेडकर, भारिप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, प्रदेश महासचिव भुईगळ, भन्ते बी. संघपाल, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे,भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, भारतीय बौद्ध महासभेचे राज्य अध्यक्ष यू.जी. बोराळे, माजी मंत्री डॉ.डी.एम. भांडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, डी.एन. खंडारे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, डॉ. हर्षवर्धन मालोकार, डॉ. रहेमान खान, डॉ. सुरेश शेळके, सुजात आंबेडकर, वंदना वासनिक, अरुंधती सिरसाट आदी धम्मपीठावर उपस्थित होते.लोकशाही व्यवस्थेत ‘ईव्हीएम’ विरोधी लढ्यात सहभागी झाल्यास निवडणूक आयोगाला मतदान प्रक्रियेसाठी ‘ईव्हीएम’ वापरासंदर्भात निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे ‘ईव्हीएम’विरोधी लढयाचा संकल्प करण्याचे आवाहन अ‍ॅड. आंबेडकर यांनी केले. एक परिवर्तन १९५० ला झाले असून, मानवतेची व्यवस्था निर्माण करण्यात आली. मानवतेच्या या व्यवस्थेला सुरुंग लावण्याची आज देशातील परिस्थिती आहे, मानवतेची ही व्यवस्था राहील की नाही, याबाबतचा फैसला २०१९ ची सार्वत्रिक निवड ठरवणार असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. मताच्या अधिकारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार घालवू शकतो, मग या शस्त्राचा योग्य वापर आपण का करीत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मताचा अधिकार या शस्त्राच्या आधारेच मोदी सरकारचा पराभव केला पाहिजे, असेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी भारिप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, प्रदेश महासचिव अमीतभाई भुईगळ, प्रा. अंजली आंबेडकर, आ. बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, यू.जी. बोराळे, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, संध्या वाघोडे, रवींद्र दारोकार गुुरुजी यांनीही विचार मांडले. भन्ते बी. संघपाल यांनी सामूहिक त्रिशरण -पंचशील दिल्यानंतर सुरू झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव खंडारे, संचालन राजाभाऊ लबडे गुरुजी यांनी, तर आभारप्रदर्शन श्रावण ठोसर यांनी केले.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर