शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शहर विकासासाठी ३00 कोटींची तरतूद करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका क्षेत्राची हद्दवाढ झाल्यामुळे शहराचा पाचपटीने विस्तार झाला आहे. नवीन प्रभागांमध्ये मूलभूत सुविधांची वानवा असून, शहर विकासासाठी किमान ३00 कोटी रुपये निधीची तरतूद करण्याची मागणी शिवसेना आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी बुधवारी सभागृहात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना केली. नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी निधी देण्यासाठी ...

ठळक मुद्देआ.बाजोरिया यांची पुरवणी मागणीवर चर्चा शासन सकारात्मक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका क्षेत्राची हद्दवाढ झाल्यामुळे शहराचा पाचपटीने विस्तार झाला आहे. नवीन प्रभागांमध्ये मूलभूत सुविधांची वानवा असून, शहर विकासासाठी किमान ३00 कोटी रुपये निधीची तरतूद करण्याची मागणी शिवसेना आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी बुधवारी सभागृहात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना केली. नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी निधी देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सभागृहात स्पष्ट केले. शहरालगतच्या २४ गावांचा मनपा प्रशासनाद्वारे पुरविल्या जाणार्‍या मूलभूत सोयी-सुविधांवर ताण पडत होता. यामध्ये रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा आदी बाबींचा समावेश होता. शहराचे भौगोलिक क्षेत्रफळ, लोकसंख्या लक्षात घेता मनपा क्षेत्राची हद्दवाढ करणे गरजेचे असल्याचा मुद्दा लोकप्रतिनिधींनी शासनाकडे लावून धरला. शिवसेना आ.गोपीकिशन बाजोरिया यांनी विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू असताना शहर विकासासाठी निधीची गरज असल्याचा मुद्दा उपस्थित केला. शासनाने वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी तसेच वस्तू व सेवा कराच्या त्रुटीवर मात करण्यासाठी महापालिकांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्याची तरतूद केली आहे. त्या पृष्ठभूमीवर हद्दवाढीमुळे शहराचा विस्तार लक्षात घेऊन विकास कामांसाठी ३00 कोटींच्या निधीची तरतूद करण्याची मागणी आ. बाजोरिया यांनी सभागृहात लावून धरली. शहरालगतच्या प्रमुख १३ ग्रामपंचायती अंतर्गत येणार्‍या २४ गावांचे मनपामध्ये विलीनीकरण झाले. या नवीन प्रभागात मूलभूत सोयी-सुविधांची दाणादाण उडाल्याची माहिती आ. बाजोरिया यांनी सभागृहाला दिली. यावर नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी उत्तर देताना शहर विकासासाठी शासन निधी देण्यास सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

महापालिका कोणतीही असो, शहराची हद्दवाढ झाली की नवीन भागात विकास कामे करण्यासाठी शासनामार्फत निधीची तरतूद करण्यात येते. हा निधी टप्प्या-टप्प्याने प्राप्त होतो. शहराचा पाचपटीने विस्तार झाल्यामुळे ३00 कोटींची मागणी केली आहे. - गोपीकिशन बाजोरिया,आमदार