शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीवर बलात्कारातील दोन्ही मुख्य आरोपी गजाआड

By admin | Updated: April 18, 2017 20:31 IST

अकोला : १० वर्षीय चिमुकलीवर सामुहीक बलात्कार करणाऱ्या दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी मंगळवारी दिली.

आरोपी वाढण्याची शक्यता, पोलीस अधीक्षकांची माहितीअकोला : जुने शहरातील १० वर्षीय चिमुकलीवर सामुहीक बलात्कार करणाऱ्या दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी मंगळवारी येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिली. शेख मुत्सेद्दीन कुरेशी अ. जाकीर कुरेशी आणि मोहसीन कुरेशी मो. अन्वर कुरेशी हे दोन आरोपींची नावे आहेत. अटकेत असलेला प्रविण चव्हाण या प्रकरणात आरोपी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. सदर प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.टिळक रोडवरील शाळेत शिक्षण घेत असलेली दहा वर्षीय चिमुकली तिचे वडील आणि आजीसोबत जुने शहरात राहते. शनिवारी शाळा आटोपल्यानंतर ती चिमुकली प्लास्टिक वेचण्याचे काम करीत असताना त्रिवेणेश्वर कॉम्प्लेक्स परिसरात गेली. या ठिकाणावरुन तिला माळीपुरा येथील रहिवासी गोविंद परशुराम साखरे (५३) याने चिमुकलीला कॉम्प्लेक्सच्या चौथ्या माळ्यावर जाण्यासाठी पैसे दिले. यासोबतच चौथ्या माळ्यावरही तुला पैसे मिळणार असल्याचे सांगितले. नासमज असलेली ही चिमुकली पैशांच्या मोहापायी चौथ्या माळ्यावर जाताच सुभाष चौकातील रहिवासी शेख मुत्सेद्दीन कुरेशी अ. जाकीर कुरेशी (१९) आणि त्याचा साथीदार ताजनापेठ परिसरातील रहिवासी मोहसीन कुरेशी मो. अन्वर कुरेशी (२०) या दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. या नराधमांच्या अत्याचाराने रक्ताने माखलेली ही चिमुकली हळुवार आणि रडतच चौथ्या माळ्यावरून खाली उतरतांना दिसताच व्यापाऱ्यांना तीच्यासोबत घडलेला प्रकार समजला, त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन आरोपींचा शोध सुरू केला असता मुलीला माळयावर पाठविणारा गोवींद साखरे याला रविवारीच अटक करण्यात आली, मात्र त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्याने या प्रकरणाचे मुख्य आरोपी शोधण्यात पोलिसांना अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि रामदास पेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत सुभाष चौकातील रहिवासी शेख मुत्सेद्दीन कुरेशी अ. जाकीर कुरेशी आणि मोहसीन कुरेशी मो. अन्वर कुरेशी (२०) या दोन नराधमांना अटक करण्यात आली. ही माहिती पोलिस अधीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर आणि शहर पोलीस उपअधिक्षक उमेश माने पाटील उपस्थित होते.