शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

टपालमतपेट्या रामभरोसे

By admin | Updated: May 8, 2014 00:50 IST

मतपेटी वार्‍यावर सोडल्याचा धक्कादायक प्रकार

 वाशिम: सुरक्षित मतदानाचा डांगोरा पिटणार्‍या निवडणूक विभागाने टपाल मतांसाठी  ठेवलेली मतपेटी मात्र बिनधास्तपणे वार्‍यावर सोडल्याचा धक्कादायक प्रकार लोकमतने केलेल्या स्टिंग मधून स्थानिक तहसिल कार्यालयात  ५ मे रोजी उघडकीस आला.  निवडणूक विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना टपाल मतांविषयी किती गांभिर्य आहे हेही या निमित्ताने उजागर झाले आहे.यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदार संघामध्ये १0 एप्रिल रोजी मतदान  प्रक्रिया पार पडली. सदर प्रक्रियेत सहभागी असलेल्या शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांना मतदानाचा हक्क बजावता यावा या साठी निवडणूक विभागाने नेहमीप्रमाणे यावेळीही टपाल मतदानाची व्यवस्था केलेली आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सदर कर्मचारी व अधिकार्‍यांना या टपाल मतपत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत. सद्या सदर मतपत्रिका गोळा करण्याचे काम  सुरू झाले असुन यासाठी तहसिल कार्यालयाच्या निवडणूक विभागात एक पेटी ठेवण्यात आली आहे.  सदर पेटीत काही मतपत्रिकाही पडल्या आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे आजमितीला वाशिम तहसिल कार्यालयाच्या निवडणूक विभागात ठेवण्यात आलेली  मतपेटीच रामभरोसे आहे. लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनने ही बाब अधोरेखित केली आहे.  कुणीही यावे अन् टपाल मतांसाठी ठेवलेली पेटी घेऊन पसार व्हावे असाच काहीसा प्रकार या ठिकाणचा झालेला आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांना या पेटीच्या सुरक्षितेचे किंचीतही गांभिर्य दिसून येत नाही.