शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

‘मै भी चौकीदार’ अभियान: रणजित पाटील, संजय धोत्रेही झाले ‘चौकीदार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 16:11 IST

अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मै भी चौकीदार’ या अभियानाचा प्रारंभ केल्यावर भाजपाच्या अनेक नेते, पदाधिकाऱ्यांसह, भाजपाच्या चाहत्यांनी आपल्या टिष्ट्वटर हॅण्डलच्या नावापुढे ‘चौकीदार’ लिहिणे सुरू केले.

अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मै भी चौकीदार’ या अभियानाचा प्रारंभ केल्यावर भाजपाच्या अनेक नेते, पदाधिकाऱ्यांसह, भाजपाच्या चाहत्यांनी आपल्या टिष्ट्वटर हॅण्डलच्या नावापुढे ‘चौकीदार’ लिहिणे सुरू केले. त्याला प्रतिसाद देत अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह खासदार संजय धोत्रे हेसुद्धा टिष्ट्वटर चौकीदार झाले आहेत; मात्र पश्चिमी वºहाडातील इतर भाजपा आमदार मात्र चौकीदार होण्यापासून बेखबरच असल्याचे समोर आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चौकीदार या शब्दाला महत्त्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात वारंवार येणारा उल्लेख तो म्हणजे मी देशाचा पंतप्रधान नसून, चौकीदार आहे. जो देशाचे संरक्षण आणि तिजोरीचे रक्षण करण्यासाठी जनतेचा सेवक म्हणून पदावर आहे; मात्र नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि अनिल अंबानी यांना राफेलचे कंत्राट दिल्यावरून काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार कॅम्पेन उघडले. याच चौकीदार शब्दाचा काँग्रेसकडून पुरेपूर प्रचारात वापर करण्यात आला. ‘चौकीदार चोर है’ या घोषणेने राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देत भाजपाने ‘मै भी चौकीदार’ हे अभियान सुरू केले असून, त्याला सोशल मीडियामध्ये प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेचा भाग होत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील व खासदार संजय धोत्रे यांनी आपल्या टिष्ट्वटर हॅण्डलचे नाव बदलत समोर चौकीदार अ‍ॅड केले आहे.आमदारांमध्ये केवळ संजय कुटेच चौकीदार, इतर अनभिज्ञ‘मै भी चौकीदार’ या अभियानाच्या अनुषंगाने पश्चिम वºहाडातील प्रमुख भाजपा नेत्यांच्या टिष्ट्वटर हॅण्डलच्या आढावा घेतला असता बुलडाण्यातील जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे वगळता एकाही आमदारांच्या टिष्ट्वटर हॅण्डलचे नाव बदलेले आढळून आले नाही. अकोल्यातील आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, वाशिममधील आमदार राजेंद्र पाटणी, लखन मलिक, बुलडाण्यातील आमदार चैनसुख संचेती, आमदार आकाश फुंडकर हे अजूनही चौकीदार होण्यापासून बेखबरच आहेत. विशेष म्हणजे, भाजपाचे जिल्हाध्यक्षही या अभियानाबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलSanjay Dhotreसंजय धोत्रे