पातूर तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींवर महिलाराज स्थापित होणार आहे. २९ ग्रामपंचायतींच्या कारभाराची सूत्रे महिलांच्या हाती येणार असल्याचे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आलेल्या महिला आरक्षण सोडतीवरून स्पष्ट झाले.
पातूर तालुक्यात एकूण ५७ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी २९ ग्रामपंचायतींमधील पदे महिलांसाठी आरक्षित झाली आहेत.
अनुुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी दिग्रस खुर्द, चरणगाव, चतारी, विवरा, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रियांकरिता शेकापूर, जांब, गोंधळवाडी, पिंपळखुटा, राहेल, भंडारज बु., खामखेड, सांगोळा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी दिग्रस बुद्रुक ,खानापूर, आष्टुल, चोंढी, कोसगाव, सुकळी, चांगेफळ, पांगरताटी, झरंडी सावरगाव, अंधार सांगवी या गावांचा समावेश आहे. देशामध्ये रावणाची पूजा करणाऱ्या एकमेव सांगोळा गावाची महिलेच्या हाती राहणार आहे. यापूर्वीच काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये बेलुरा खुर्द, बोडखा, भंडारज खुर्द, चान्नी ,वाहाळा बुद्रुक, पांढुर्णा ही गावे अनुसूचित जाती सर्वसाधारण अशी राखीव आहेत. अनुसूचित जमाती, सर्वसाधारणसाठी शिर्ला, देऊळगाव, सस्ती, आलेगाव सदर गावे आरक्षित झाली आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या सर्वसाधारण गटासाठी तांदळी खुर्द, बेलुरा बुद्रुक, माळराजुरा, सावरखेड, बाबुळगाव, मळसुर, गावंडगाव यापूर्वीच राखीव झाली आहेत. तुलंगा बुद्रुक, तांदळी बुद्रुक, कोठारी बु., आगीखेड, मलकापूर, खेट्री, तुलंगा खुर्द, सायवनी, उमरा, कार्ला, नवेगाव ही गावे सर्वांसाठी खुली आहेत. सदर आरक्षण सन २०-२५ याकरिता लागू आहे.
नुकत्याच पातूर तालुक्यातील मुदत संपलेल्या २३ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या ९ फेब्रुवारी आणि ११ फेब्रुवारी या दरम्यान प्रथम सभा आयोजित करण्यात आली. त्यामुळे या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेले आरक्षण महिलांसाठी आनंददायी तर पुरुषांच्या आनंदावर विरजण टाकणारे ठरले. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्या उपस्थितीत पातूर तालुक्यातील २९ ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. सदर कामकाजामध्ये पातूर तहसीलदार दीपक बाजड, महसूल सहायक सचिन भांबेरे, भूषण बोर्डे यांनी सहभाग नोंदवला.