शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा वीज यंत्रणेला फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 14:29 IST

Akola, MSEDCL भागातील वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला असून, काही भागात रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित होता.

अकोला: जिल्ह्यात रविवारी दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे महावितरणला मोठा फटका बसला. वादळामुळे जिल्ह्यातील ११ केव्हीचे ३० फिडर आणि ३३ केव्हीच्या पाच उपकेंद्रांमध्ये ब्रेकडाऊन झाला होता. त्यामुळे अकोला शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. फिडर दुरुस्तीसाठी महावितरणचे कर्मचारी युद्धस्तरावर प्रयत्न करत असून, काही भागातील वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला असून, काही भागात रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित होता.वादळी वाºयासह झालेल्या पावसासोबतच विजांच्या कडकडाटामुळे जिल्ह्यातील विविध भागात ब्रेकडाऊन झाला होता. त्यामुळे महावितरणला मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून वीज वाहिन्यांवर पडल्याने वीज वाहिन्या तुटल्या, तर काही ठिकाणी वीज वाहिन्यांचे इन्सुलेटर फुटले. यामुळे महावितरणला मोठे नुकसान झाले असून, जिल्ह्यातील अनेक भाग प्रभावित झाले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने ब्रेकडाऊन झालेल्या ३० फिडरपैकी १८ फिडरवरील वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे. महावितरणचे कर्मचारी युद्धस्तरावर दुरुस्तीसाठी प्रयत्न करीत आहेत; परंतु वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी त्या वीज वाहिन्यांची संपूर्ण पेट्रोलिंग करून फॉल्ट शोधावे लागतात. त्यामुळे या काळात ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या अकोला महामंडळातर्फे करण्यात आले.शहरातील चार फिडरवर ब्रेकडाऊनअकोला शहरातील ११ केव्ही तारफैल, आरपीटीएस, न्यू तापडियानगर आणि शिवशक्ती या चारही फिडरवर ब्रेकडाऊन आहेत. त्यामुळे या फिडरवरील वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित आहे. रात्रीची वेळी असल्याने वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी फॉल्ट शोधणे जिकिरीचे असते. असे असले तरी महावितरण कर्मचारी युद्धस्तरावर प्रयत्न करत आहेत.ग्रामीण भागातील १२ फिडरवर ब्रेकडाऊनग्रामीण भागातील १२ फिडर आणि ३३ केव्हीचे विझोरा, बार्शीटाकळी, मोहदा, हातरूण आणि मनात्री हे पाच उपकेंद्र ब्रेकडाऊनमध्येच आहेत. कृषी फिडर वगळता शहर व गावठाण फिडरचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी प्राधान्य देत असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkolaअकोला