शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
5
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
6
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
8
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
9
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
10
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
11
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
13
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
14
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
15
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
16
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
17
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
18
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
19
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
20
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन

महावितरणला ग्राहक मंचचा दणका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2016 02:08 IST

जादा वीज देयक आकरणीसह ग्राहकास मानसिक मनस्ताप देणे भोवले!

अकोला: वीज ग्राहकास अतिरिक्त वीज देयकासह दंड आकारून वीज जोडणी तोडल्याप्रकरणी ग्राहक तक्रार निवारण मंचाने वीज महावितरण कंपनीला फटकारले असून ग्राहकास झालेल्या त्रासापोटी ५ हजार रुपयांचा दंड आकारला. हा निर्णय ग्राहक मंचाने बुधवार १३ जुलै रोजी दिला. आकोट येथील वीज ग्राहक हसानंद जाधवाणी यांचा विजेचा वापर केवळ ५0 ते ८0 युनिट असताना, महावितरणने सप्टेंबर २0१५चे वीज बिल तब्बल ५१७ युनिटचे वीज देयक पाठवले. त्यासंबंधी तक्रार दाखल केली. मीटर नादुरुस्त असल्यामुळे अतिरिक्त वीज बिल आल्याची सबब देत वीज कंपनीने मीटर बदलून दिले. त्यानंतर त्यांना १९७ युनिटचे देयक देण्यात आले. त्यामध्ये १६४ युनिट पूर्वीच्या मीटरचे तर ३३ युनिट नवीन मीटरचे गृहित धरण्यात आले. त्यामुळे बिल दुरुस्तीसाठी पुन्हा तक्रार दिली. त्याकडे मात्र वीज कंपनीने पूर्णत: दुर्लक्ष केले. त्यानंतर वारंवार तक्रार देऊनही कुठलीही कारवाई झाली नाही; मात्र ७ मार्च २0१६ रोजी रात्री अचानक त्यांच्या घरचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर संपर्क साधल्यानंतर त्यांनी वीज देयकाचे अर्धे पैसे भरावयास सांगितले. त्यानंतर जाधवाणी यांनी दुसर्‍या दिवशी ६ हजार रुपयांसह पुनजरेडणीसाठी ५0 रुपयांचा भरणा केला. त्यानंतर पुन्हा २२ मार्च रोजी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. लेखी तक्रार दिल्यानंतर रात्री ८ वाजताचा सुमारास पूर्ववत करण्यात आला. वीज कंपनीच्या या मनमानी कारभाराने व्यथित झालेल्या जाधवाणी यांनी ग्राहक मंचात धाव घेतली. या सुनावणीमध्ये ग्राहक मंचाने सप्टेंबर-ऑक्टोबर २0१५च्या जादा देयक देण्याबाबत तसेच नियमबाह्य वीजपुरवठा खंडित करण्याच्या प्रकारावर ताशेरे ओढले. सप्टेंबर २0१५ पूर्वी व तसेच नवीन मीटर बसविल्यानंतर वीज देयकांनुसार त्यांचा विजेचा वापर ५0 ते ८0 युनिटच्या दरम्यान असल्यामुळे ५१७ तथा १९७ युनिटचे देयक जादा असल्याचे नोंदवून वीज वितरण कंपनीस ५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले. त्याचसोबत ग्राहकाला झालेल्या नाहक मनस्तापासाठी १ हजार रुपयांचा दंड देण्यात आला. या दंडाची रक्कम दोषी कर्मचार्‍याच्या वेतनातून क पात करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी ग्राहकाची बाजू आशीष चंदराणा यांनी मांडली.