शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

महावितरणच्या पोर्टलमध्ये पाच दिवसांपासून तांत्रिक बिघाड; ग्राहकांना भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 12:00 IST

अकोला : वीज बिल भरणाच्या ‘ड्यू डेट’च्या तोंडावर महावितरण कंपनीच्या मुंबईच्या मुख्य पोर्टलमध्ये ‘बग’ (व्हायरस) आल्याने आॅनलाइन बिल स्वीकारण्याची प्रणालीच ठप्प पडली आहे.

ठळक मुद्देया तांत्रिक बिघाडाच्या दुरुस्तीचे कार्य पाच दिवसांपासून सुरू आहे. ही समस्या आल्याने राज्यातील ४० टक्के ग्राहकांना विलंब शुल्क भरावे लागणार आहे.

- संजय खांडेकरअकोला : वीज बिल भरणाच्या ‘ड्यू डेट’च्या तोंडावर महावितरण कंपनीच्या मुंबईच्या मुख्य पोर्टलमध्ये ‘बग’ (व्हायरस) आल्याने आॅनलाइन बिल स्वीकारण्याची प्रणालीच ठप्प पडली आहे. गत पाच दिवसांपासून आलेल्या या तांत्रिक बिघाडाच्या दुरुस्तीचे कार्य पाच दिवसांपासून सुरू आहे. महावितरण कंपनीच्या तांत्रिक बिघाडाचा फटका मात्र काहीही कारण नसताना राज्यातील कोट्यवधी ग्राहकांना सहन करावा लागणार आहे.संपूर्ण देश डिजिटल इंडियाच्या दिशेने प्रवास करीत असून, प्रत्येक कार्यालय हळूहळू कॅशलेस होत आहे. महावितण कंपनीनेदेखील वीज बिल भरणासाठी विविध अ‍ॅप सेवेत ठेवले आहेत. त्यामुळे मेट्रो आणि प्रगत शहरांमध्ये जवळपास ८० टक्के वीज बिलचा भरणा आॅनलाइन पद्धतीनेच होत आहे. एकीकडे ग्राहक आॅनलाइन यंत्रणेकडे वळत आहे, तर दुसकरीकडे मात्र अजूनही आपली तांत्रिक यंत्रणा पाहिजे त्या तुलनेत सक्षम झालेली नाही. याचे ताजे उदाहरण महावितरण कंपनीकडून नागरिकांना मिळाले आहे. आॅगस्ट महिन्याचे वीज बिल नागरिकांना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळाले. जेव्हा नागरिकांनी आॅनलाइन बिल भरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र ही साईट उघडली नाही. ७ सप्टेंबरपासून ही साईट बंद असल्याने महावितरणला आॅनलाइन ट्रान्झेक्शनवर येणारा शेकडो कोटींचा महसूल थांबला आहे. वीज बिल भरणाच्या ड्यू डेटच्या तोंडावर ही समस्या आल्याने राज्यातील ४० टक्के ग्राहकांना विलंब शुल्क भरावे लागणार आहे. वास्तविक बिघाड कंपनीचा आणि हकनाक भुर्दंड मात्र ग्राहकांना बसणार असल्याचे चित्र आहे. वीज ग्राहकांचे खिसू कापून महसूल वाढविण्याची ही नवी शक्कल तर नाही ना, अशी शंकाही तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.- महावितरणच्या मुंबईतील मुख्य पोर्टलमध्ये बग आला आहे. हार्डडिक्सच्या दुरुस्तीचे कार्य सुरू आहे. लवकरच राज्यातील यंत्रणा कार्यरत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.-अरविंद हावरे , मुख्य व्यवस्थापक, आयटी विभाग मुंबई.- महावितरणच्या पोर्टलवरील बिघाडामुळे ग्राहकांना वीज बिल भरणा करण्यास त्रास होत असल्याची कल्पना आहे. ही समस्या तांत्रिक बिघाडाची असल्याने आम्ही वरिष्ठांना कळविले आहे.-पवनकुमार कछोट, अधीक्षक अभियंता, महावितरण, विभाग अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण