शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी गुण व कौशल्याचा वापर ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी करावा - मुख्य अभियंता अरविंद भादिकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 16:24 IST

अकोला : महावितरणमध्ये विविध गुण व कौशल्य असलेले कर्मचारी कार्यरत असून, नाट्य व क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, त्यांनी गुण आणि कौशल्याचा वापर इतर क्षेत्रासोबतच कंपनी व ग्राहकांसाठी करून महावितरणचा नावलौकिक आणखी वाढवावा, असे आवाहन अकोला परीमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांनी केले.

ठळक मुद्देविद्युत भवन येथे २५ व २६ जानेवारी रोजी महावितरण अंतर्गत कर्मचाºयांच्या टेबलटेनिस व कॅरम स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.या स्पर्धेतील विजेता व उपविजेत्याचा सत्कार मुख्य अभियंता व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.दिया बचे, भरत डिक्कर आणि वंदना बाबर यांचा विशेष सत्कार

अकोला : महावितरणमध्ये विविध गुण व कौशल्य असलेले कर्मचारी कार्यरत असून, नाट्य व क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, त्यांनी गुण आणि कौशल्याचा वापर इतर क्षेत्रासोबतच कंपनी व ग्राहकांसाठी करून महावितरणचा नावलौकिक आणखी वाढवावा, असे आवाहन अकोला परीमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांनी केले. विद्युत भवनाच्या क्रीडा भवन सभागृहात आयोजित क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.विद्युत भवन येथे २५ व २६ जानेवारी रोजी महावितरण अंतर्गत कर्मचाºयांच्या टेबलटेनिस व कॅरम स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या व्यासपीठावर अधीक्षक अभियंता दिलीप दोडके, कार्यकारी अभियंता डी.एम.मानकर, प्रणाली विश्लेषक सचिन राठोड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे व जनसंपर्क अधिकारी विकास आढे उपस्थित होते. स्पर्धेतील पुरुष गटामध्ये कॅरम प्रथम: सुरेंद्र श्रीरसागर, द्वितीय: अनिल मेसरे तर टेबलटेनिस प्रथम: संजय जांगीड, द्वितीय: संदीप वानखडे तसेच महिला गटामध्ये कॅरम प्रथम: ऋतुजा पाटखेडकर, द्वितीय कृतिका भागवत आणि टेबलटेनिस प्रथम: स्वाती जाधव तर द्वितीय: कोमल पुरोहित यांनी क्रमांक पटकाविला. या सर्व विजेता व उपविजेत्याचा सत्कार मुख्य अभियंता व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.शहर विभागात वरिष्ठ तंत्रज्ञ असलेले कैलास बचे यांची कन्या दिया बचे हिने बॉक्सिगच्या राष्टीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सातत्यपूर्णपणे करीत असलेल्या कामगिरीबद्दल तसेच अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या ६३ व्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिग स्पर्धेत रजत पदक पटकाविल्याबद्दल तीचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. महावितरणमध्ये सेवा बजावीत असताना सोबतच विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरी व योगदानाबद्दल यामध्ये क्रिकेटमधे भरत डिककर आणि नाट्याक्षेत्रामध्ये वंदना बाबर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी देशभक्तीवर गीत तंत्रज्ञ सुखराम बुंदेले यांनी तर ऋतुजा पांटखेडकर यांनी पसायदान सादर केले. संचालन व आभार उपवव्यस्थापक गुरमीतसिह गोसल यांनी तर प्रास्ताविक उपमुख्य औधोगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे यांनी केले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरmahavitaranमहावितरणAkola Vidhyut Bhavanअकोला विद्युत भवन