शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वीज जोडणीकरिता महावितरण देणार घरपोच सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ज्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना नवीन वीज जोडणी हवी आहे, अशा इच्छुक ग्राहकांसाठी ‘कनेक्शन ऑन कॉल सेवा’ महावितरणतर्फे सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी ग्राहकांना मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे आपले नाव, मोबाइल क्रमांक व घरचा पत्ता इत्यादी माहितीची नोंदणी करावी लागणार आहे.नवीन वीज जोडणी सुलभतेने ...

ठळक मुद्देग्राहकांना मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे नोंदणी करावी लागणार या कक्षामार्फत संबंधित कार्यालयाला कळविण्यात येईल कार्यालयातील कर्मचारी वीज जोडणीसाठी लागणारा फॉर्म घेऊन स्वत: या ग्राहकाच्या घरी जातील

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ज्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना नवीन वीज जोडणी हवी आहे, अशा इच्छुक ग्राहकांसाठी ‘कनेक्शन ऑन कॉल सेवा’ महावितरणतर्फे सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी ग्राहकांना मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे आपले नाव, मोबाइल क्रमांक व घरचा पत्ता इत्यादी माहितीची नोंदणी करावी लागणार आहे.नवीन वीज जोडणी सुलभतेने मिळावी. तसेच याबाबत तक्रार असल्यास ती तातडीने सोडविली जावी. तसेच ग्राहकांच्या नावात बदल करणे सुलभ व्हावे, यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात एप्रिल २0१७ पासून विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचा आतापर्यंत सुमारे ७९२ ग्राहकांनी लाभ घेतला आहे. ग्राहकांचा प्रतिसाद बघून, या विशेष कक्षाची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली आहे. नवीन वीज जोडणी हवी असलेल्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकाने मुख्यालयातील मदत कक्षाला दूरध्वनी केल्यानंतर त्या कक्षातील कर्मचारी या ग्राहकाची सविस्तर माहिती घेतील.  त्यानंतर या कक्षामार्फत संबंधित कार्यालयाला कळविण्यात येईल.  त्यानुसार त्या कार्यालयातील कर्मचारी वीज जोडणीसाठी लागणारा फॉर्म घेऊन स्वत: या ग्राहकाच्या घरी जातील व फॉर्म भरून घेतील. यावेळी कर्मचारी ग्राहकाचे सर्व विहित कागदपत्रे घेतील आणि त्याला लवकरात लवकर वीज जोडणी देण्याचा प्रयत्न करतील.नवीन वीज जोडणीसाठी इच्छुक असणार्‍या ग्राहकाला ओळखपत्र पुरावा म्हणून निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड, वाहनपरवाना, फोटोपास (शासन मान्यताप्राप्त छायाचित्रीत ओळखपत्र), खरेदी-विक्री कराराचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, शासनाने दिलेले वरिष्ठ नागरिकाचे ओळखपत्र, यापैकी एक तसेच पत्याचा पुरावा म्हणून शिधापत्रिका, स्थानिक करपावती, सक्षम शासकीय अधिकार्‍यांचा मंजूर नकाशा, घरमालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र (अर्जदार भाडेकरू असल्यास), शासनाने दिलेले मालमत्ता कार्ड किंवा सातबाराचा उतारा इत्यादीपैकी एक कागदपत्र महावितरणच्या कर्मचार्‍याकडे द्यावे लागणार आहे.