शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

‘महावितरण’ देशातील दुसरी उत्कृष्ट वीज वितरण कंपनी

By admin | Updated: November 22, 2014 23:33 IST

आयसीसीच्या अहवालात गौरवपूर्ण उल्लेख.

अकोला: मागणीप्रमाणे वीज पुरवठा व फिडरनिहाय भारनियमनाच्या नवीन प्रयोगासह, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)ने राबविलेल्या विविध प्रभावशाली उपाययोजनांची दखल, इंडियन चेंबर ऑफ कॉर्मस (आयसीसी)ने घेतली असून, आयसीसीच्या ताज्या अहवालात, महावितरण ही देशातील द्वितीय क्रमांकाची उत्कृष्ट वीज वितरण कंपनी असल्याचा, गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे. गुजरातमधील वीज वितरण कंपनीला प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. आयसीसीच्या वतीने देशातील विविध विद्युत वितरण कंपन्यांच्या कार्यशैलीचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासावर आधारित अहवालात, ज्या कंपन्यांनी विद्युत सेवा क्षेत्रात प्रभावी उपक्रम राबवून ग्राहकांना उत्तम सेवा दिलीे, अशा पाच कंपन्यांचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे. अहवालात अनुक्रमे गुजरात, महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल, हिमाचल प्रदेश आणि उत्तरांचल या राज्यांमधील वीज वितरण कंपन्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याचे नमुद केले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (एमएसईबी)चे २00५ मध्ये महानिर्मिती, महापारेषण व महावितरण अशा तीन कंपन्यांमध्ये विभाजन झाले. विजेच्या क्षेत्रात, १९४७ ते २00५ या कालखंडात राज्यात जेवढा विकास झाला, त्यापेक्षा जास्त विकास गत नऊ वर्षात झाल्याचा दावा महावितरणने केला आहे. महावितरणने गावठाण फिडर सेपरेशन योजना, सिंगल फेजिंग याद्वारे भारनियमनाचे प्रभावी व्यवस्थापन केले आहे. गत पाच वर्षात महाराष्ट्रात १0 लाखांपेक्षा अधिक कृषिपंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. *ह्यवसुलीनुसार भारनियमनह्ण फॉर्म्युल्याचा फायदा ज्या भागात वीजगळती जास्त, त्या भागात भारनियमन असा नवीन फॉम्र्युला महावितरणे राबविला. त्याचीच दखल आयसीसीने घेतली आहे. ज्या भागात विद्युत गळती जास्त, त्या भागात भारनियमन, तर ज्या भागात वसुली चांगली व नियमित, त्या भागातील ग्राहकांना भारनियमनापासून मुक्ती, हा उपक्रम देशभरात नावाजल्या जात आहे.