शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण परिमंडलीय नाट्यस्पर्धा : अकोला परिमंडलाच्या ‘एक क्षण आयुष्याचा’ला द्वितीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 17:42 IST

अकोला : महावितरणच्या प्रादेशिक स्तरीय आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेत अकोला परिमंडलाच्या चंद्रकांत शिंदे लिखित व नितीन नांदुरकर दिग्दर्शित ‘एक क्षण आयुष्याचा’ ने नाट्य आणि दिग्दर्शनाचे द्वितीय पुरस्कार पटकावला.

ठळक मुद्देनागपुर येथील सायन्टिफिक सोसायटी सभागृहात १५ व १६ जानेवारी रोजी दोन दिवसीय आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धा पार पडली.नागपूर परिमंडलातर्फे देवेंद्र वेलणकर लिखित ‘ते दोन दिवस’ या नाट्यप्रयोगास प्रथम पारितोषिक.अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादिकर अधीक्षक अभियंते डी. एम. कडाळे,दिलीप दोडके व विनोद बेथारीया यांनी कौतुक केले.

अकोला : महावितरणच्या प्रादेशिक स्तरीय आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेत अकोला परिमंडलाच्या चंद्रकांत शिंदे लिखित व नितीन नांदुरकर दिग्दर्शित ‘एक क्षण आयुष्याचा’ ने नाट्य आणि दिग्दर्शनाचे द्वितीय पुरस्कार पटकावला. याशिवाय उत्कृष्ट रंगभूषा व संगीत यामध्ये प्रथम तर उत्कृष्ट महिला व पुरुष कलावंत यामध्ये द्वितीय सोबतच उतेजनार्थ पुरस्कारही पटकाविले. नागपूर परिमंडलाच्या‘ते दोन दिवस’ ला प्रथम नाट्य पुरस्कार मिळाला.लक्ष्मीनगरातील सायन्टिफिक सोसायटी सभागृहात १५ व १६ जानेवारी रोजी आयोजित दोन दिवसीय आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेत नागपूर प्रादेशिक कार्यालय क्षेत्रांतर्गत असलेल्या पाचही परिमंडलांनी उत्कृष्ट नाट्यप्रयोग सादर करीत रसिक प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवले. या स्पर्धेत अमरावती परिमंडलातर्फे प्रशांत शेंबेकर लिखित ‘काही सावल्यांचे खेळ’ हा नाट्यप्रयोग, जयंत पवार लिखित ‘अधांतर’ हा नाट्यप्रयोग, अकोला परिमंडलातर्फे ‘एक क्षण आयुष्याचा’हा नाट्यप्रयोग, नागपूर परिमंडलातर्फे देवेंद्र वेलणकर लिखित ‘ते दोन दिवस’ हा नाट्यप्रयोग तर गोंदीया परिमंडलातर्फे श्रीपाद जोशी लिखित ‘वादळ वेणा’हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.महावितरणचे संचालक (संचलन) अभिजित देशपांडे यांच्या हस्ते आणि महाकवी सुधाकर गायधनी यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने महावितरणच्या एकूण ३२ कलावंतांनी रंगभूमीवर पदार्पण केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी व्यासपीठावर महावितरण नागपूरचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, 'महावितरण'चे मुख्य अभियंते रफीक शेख, सुहास रंगारी, दिलीप घुगल, अरविंद भादीकर गोंदिया परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता लीलाधर बोरीकर तसेच परीक्षक मधु जोशी, शोभना मोहरील, किशोर डाऊ रंगमंचावर उपस्थित होते. महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंते हरिष गजबे, सुरेश मडावी, दिलीप दोडके, मनिष वाठ, नारायण आमझरे, सुहास मेत्रे यांचेसह अनेक नाट्यरसिक या पाचही नाट्य प्रयोगांना मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन किशोर गलांडे यांनी तर आभार प्रदर्शन नारायण आमझरे यांनी केले. या यशाबद्दल ‘एक क्षण आयुष्याचा’ मधील सर्व कलावंतांचे अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादिकर अधीक्षक अभियंते डी. एम. कडाळे,दिलीप दोडके व विनोद बेथारीया यांनी कौतुक केले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkola cityअकोला शहरcultureसांस्कृतिक