शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात महावितरणकडून सुरक्षा उपायांचा जागर; रॅलीने झाला विद्युत सुरक्षा सप्ताहाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 16:23 IST

अकोला : विद्युत सुरक्षिततेचे नियम सर्वांना माहीत असले तरी, सातत्याने प्रबोधन करून ग्राहकांना माहिती दिली पाहिजे. विद्युत सुरक्षितता ही फक्त सप्ताहापुरती न राहता नेहमीच नियम पाळणे गरजेचे असल्याचे आवाहन अकोला परिमंडळाच्या पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल डोये यांनी केले.

ठळक मुद्देविद्युत सुरक्षेबाबत प्रबोधन व जनजागरण करण्याकरीता ११ ते १७ जानेवारी दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.समारोप सोहळ्यानिमित्त विद्युत भवन येथून सुरु झालेल्या रॅलीला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली.सिविल लाईन चौक, पोस्ट आॅफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, सिटी कोतवाली, टिळक रोड, अग्रसेन चौक या मागार्ने जनजागरण करीत विद्युत भवन येथे समारोप झाला.

अकोला : विद्युत सुरक्षिततेचे नियम सर्वांना माहीत असले तरी, सातत्याने प्रबोधन करून ग्राहकांना माहिती दिली पाहिजे. विद्युत सुरक्षितता ही फक्त सप्ताहापुरती न राहता नेहमीच नियम पाळणे गरजेचे असल्याचे आवाहन अकोला परिमंडळाच्या पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल डोये यांनी केले. ते विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त महावितरणच्या वतीने विद्युत भवनातील आवारात बुधवारी आयोजित जनजागृती रॅलीच्या समारोप प्रसंगी बोलत होते.घरगुती व सार्वजनिक यंत्रणेच्या विद्युत सुरक्षेबाबत प्रबोधन व जनजागरण करण्याकरीता ११ ते १७ जानेवारी दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत विद्युत नियमांचे पालन व्हावे तसेच घरगुती व सार्वजनिक वीज यंत्रणेपासून सावधगिरी बाळगण्याबाबत जाणीव जागृती निर्माण व्हावी म्हणून महावितरणच्या वतीने सप्ताहाचा समारोप १७ जानेवारी रोजी विद्युत सुरक्षा जनजागरण रॅलीने करण्यात आला. यावेळी विद्युत भवन येथून सदर रॅलीला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

सहाय्यक महाव्यवस्थापक शशिकांत पाटील, कार्यकारी अभियंते धर्मेंद्र मानकर व अजय खोब्रागडे, उपविधी अधिकारी सुनील उपाध्ये, प्रणाली विश्लेषक सचिन राठोड अतिरिक्त कार्यकारी अभियंते प्रदीप घोरुडे, गणेश महाजन, लीना नागापुरे यांचेसह अभियंते, अधिकारी व जनमित्र उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

सदर रॅली सिविल लाईन चौक, पोस्ट आॅफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, सिटी कोतवाली, टिळक रोड, अग्रसेन चौक या मागार्ने जनजागरण करीत विद्युत भवन येथे समारोप झाला. रॅलीदरम्यान नागरिकांना सुरक्षा पत्रकाचे वाटप करण्यात आले. शेवटी सर्वांना सुरक्षिततेची सामुहिक प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जनसंपर्कअधिकारी विकास आढे यांनी केले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरmahavitaranमहावितरण