शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र पोलिसांची २00 रुपये प्रवास भत्त्यावर बोळवण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:30 IST

पोलिसांना गुन्हय़ांचा तपास, आरोपींचा शोध घेण्यासाठी अनेकदा राज्याबाहेर जावे लागते.  राज्य किंवा राज्याबाहेर जाण्यासाठी शासनाकडून पोलिसांना केवळ २00 रुपयेच प्रवासभत्ता मिळतो. इतर राज्यांमधील पोलिसांच्या तुलनेत महाराष्ट्र पोलिसांना मिळणारा प्रवासभत्ता अत्यंत तोकडा आहे. परिणामी, पोलिसांना स्वत:च्या खिशातूनच प्रवासाचा खर्च भागवावा लागत आहे.

ठळक मुद्देइतर राज्यांतील पोलिसांना १५00 रुपये प्रवास भत्तामहाराष्ट्र पोलिसांना प्रवास भत्ता अन् वेतनही कमी

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पोलिसांना गुन्हय़ांचा तपास, आरोपींचा शोध घेण्यासाठी अनेकदा राज्याबाहेर जावे लागते.  राज्य किंवा राज्याबाहेर जाण्यासाठी शासनाकडून पोलिसांना केवळ २00 रुपयेच प्रवासभत्ता मिळतो. इतर राज्यांमधील पोलिसांच्या तुलनेत महाराष्ट्र पोलिसांना मिळणारा प्रवासभत्ता अत्यंत तोकडा आहे. परिणामी, पोलिसांना स्वत:च्या खिशातूनच प्रवासाचा खर्च भागवावा लागत आहे. दुसर्‍यांच्या समस्या सोडविणार्‍या पोलिसांना मात्र स्वत:च्या समस्या शासनदरबारी मांडता येत नसल्याने, त्यांची कुचंबणा होत आहे. गुन्हा घडल्यानंतर अनेकदा आरोपी परराज्यातील असतात किंवा राज्याबाहेर पळून जातात. अशावेळी पोलिसांना तपास, शोधकामी देशातील इतर राज्यांमध्ये प्रवास करावा लागतो. प्रवास, भोजन, निवास आदी बाबींवर पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांचा मोठा खर्च होतो. असे असतानाही शासनाकडून मात्र पोलिसांना एक दिवसासाठी केवळ २00 रुपये एवढाच प्रवासभत्ता मिळतो. २00 रुपयांमध्ये रेल्वेचे तिकीटही मिळत नाही; परंतु पोलीस अधिकारी, कर्मचारी निमूटपणे स्वत:च्या खिशातून खर्च भागवून आरोपींना पकडण्याचा, गुन्हय़ांचा तपास करण्याचा प्रयत्न करतात; परंतु त्यांची ही समस्या शासनदरबारी मांडता येत नाही. तेलंगाना राज्यातील पोलीस शिपायाला एका दिवसाचा प्रवासभत्ता १५00 रुपये मिळतो आणि महाराष्ट्र पोलिसांच्या तुलनेत तेलंगाना, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान राज्यांमधील पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांचे वेतनही अधिक आहेत.  तेलंगाना राज्यातील पोलीस शिपायाचे बेसिकच २२ हजार ४६0 रुपये आहे, तर त्यांच्या बेसिकएवढा पगार महाराष्ट्र पोलीस शिपायाचा आहे. तेलंगाना पोलिसांना १५ अधिक ५ सीएल आहेत. वरून ११/२ म्हणजे १३ महिन्यांचा पगार अधिक आहे. महाराष्ट्र पोलिसांची त्याउलट स्थिती आहे. यावरून महाराष्ट्र व इतर राज्यांमधील पोलीस कर्मचार्‍यांच्या वेतनाची, प्रवासभत्त्याची तुलना केल्यास मोठय़ा प्रमाणात तफावत दिसून येते. वेतन, प्रवासभत्ता कमी आणि वर्षभर बंदोबस्त, गुन्हय़ांचा तपास आदी कामांचा ताण जास्त, अशी महाराष्ट्र पोलिसांची स्थिती आहे. या सर्व बाबींचा परिणाम पोलीस कर्मचारी, त्यांच्या आरोग्यावर, कुटुंबीयांवरसुद्धा दिसून येतो. 

टॅग्स :Policeपोलिस