शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विभागीय बॉक्सिंग स्पर्धेचे अजिंक्यपद महाराष्ट्राकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 14:16 IST

अकोला: मापसा (गोवा) येथे झालेल्या पश्चिम विभागीय ज्युनिअर मुले आणि मुली बॉक्सिंग अजिंक्यपद-२०१९ स्पर्धेत महाराष्ट्र संघाने १६ सुवर्ण व पाच रौप्य पदकांची कमाई करीत अजिंक्यपद पटकावले.

अकोला: मापसा (गोवा) येथे झालेल्या पश्चिम विभागीय ज्युनिअर मुले आणि मुली बॉक्सिंग अजिंक्यपद-२०१९ स्पर्धेत महाराष्ट्र संघाने १६ सुवर्ण व पाच रौप्य पदकांची कमाई करीत अजिंक्यपद पटकावले. मुलांच्या गटात १० सुवर्ण आणि दोन रौप्य तर मुलींच्या गटात सहा सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांची कमाई महाराष्ट्र संघाने केली. अकोल्याच्या विश्व गोटे याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत गोव्याच्या सचिन महातो याचा पराभव करीत ७० ते ७५ किलो वजनगटाचे विजेतेपद मिळविले.महाराष्ट्राच्या मुले व मुली दोन्ही संघांनी विजेतेपद आणि मोस्ट प्रोमोसिंग बॉक्सर पुरस्कार पटकावला. मुलांमध्ये ४६ किलो वजनगटात अजय शिर्के, ४८ किलो वजनगटात राज पाटील, ५० किलो वजनगटात हर्षिद शेख, ५२ किलो वजनगटात अर्पित जैसवार, ५४ किलो वजनगटात आदित्य गौड, ५७ किलो वजनगटात आयुष मोकाशी, ६० किलो वजनगटात रहिम शेख, ६३ किलो वजनगटात कुणाल घोरपडे, ७० किलो वजनगटात चेतन काळेकर, ७५ किलो वजनगटात विश्व गोटे यांनी सुवर्णपदक पटकावले. ऋषिकेश गोसावी आणि ओम टोपले यांनी रौप्य पदक मिळविले.मुलींच्या गटात ४६ किलो वजनगटात जान्हवी चौरी, ४८ किलो ऋषिका होले, ५२ किलो मृणाल जाधव, ५४ किलो आर्या भारटके, ५७ किलो नृता शाह, ६३ किलो दिशा पाटील यांनी सुवर्ण पदक मिळविले. ५० किलो वजनगटात हर्षदा लोहत, ६० किलो सादिया शेख आणि ६६ किलो वजनगटात सृष्टी जाधव यांनी रौप्य पदक मिळविले. विश्व गोटे याला राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट आणि राष्ट्रीय पंच तथा प्रशिक्षक विजय गोटे यांचे मार्गदर्शन लाभले. 

 

टॅग्स :Akolaअकोलाboxingबॉक्सिंगgoaगोवा