शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election Voting Live : ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह तरुणांना लाजविणारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 15:39 IST

तरुणांमध्ये तर निवडणुकीविषयी उत्साह आहेच; परंतु ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह हा तरुणांनाही लाजविणार असल्याचे दिसून येत आहे.

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी अकोला मतदारसंघात मतदान सुरु असून, नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडताना दिसून येत आहेत. तरुणांमध्ये तर निवडणुकीविषयी उत्साह आहेच; परंतु ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह हा तरुणांनाही लाजविणार असल्याचे दिसून येत आहे. अकोला शहरासह ग्रामीण भागात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी मतदान केंद्रांवर येत असल्याचे चित्र दिसून आले.अकोला शहरातील राधाबाई देशमुख या वयोवृद्ध महिलेने मतदान केले. तर पातूर तालुक्यातील शिर्ला येथील मतदान केंद्रावर वयाची शंभरी पार केलेल्या गयाबाई तुकाराम बेलुरकर यांनी मतदान केले. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना उचलून मतदान केंद्रावर आणले. याचप्रमाणे विविध मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी दिसून येत होती. प्रखर उन्हातही ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी येत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळाले.

मतदानाचा टक्का वाढवा यासाठी प्रशासनाच्या वतीने लोणाग्रा मतदान  केंद्रावर 96 वर्षे  वयाचे मतदार किसनलाल शर्मा यानी मतदान केले. त्याना पायाला थोडी इजा जाली होती; परंतु ह्या वेळेत निवडणूक विभागा कड़ून मतदान केद्रावर मेडिकल किट ठेवण्यात आली तेव्हा केद्रावर येथील आंगनवाड़ी सेवीका कडून त्यांना प्रथमोपचार करण्यात आले.

दरम्यान, दुपारी १ वाजेपर्यंत ३४ टक्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. गुरुवारी सकाळपासूनच मतदानाचा उत्साह दिसून येत आहे. शहरासह जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदान यंत्र सुरु न होण्याच्या किरकोळ घटनांचा अपवाद वगळता मतदानाला सुरुवात झाली. अकोला लोकसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.५६ टक्के मतदान झाले होते. मतदानासाठी जिल्ह्यात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, आतापर्यंत कोणत्याही अप्रिय घटनेचे वृत्त नाही. संवेदनशिल व अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. उन्हाचा पारा कमी असल्याने सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रांवर मोठी गर्दी दिसून येत आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकakola-pcअकोलाAkolaअकोला