शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : आज फैसला; मैदानात कोण राहणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 10:56 IST

मैदानात कोण कायम राहणार, याचा निर्णय सोमवार, ७ सप्टेंबर रोजी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल झाल्यानंतर जवळपास प्रत्येक मतदारसंघात बंडखोरांनी पक्षाच्या उमेदवारांसह प्रतिस्पर्धी पक्षाच्या उमेदवारांनाही कोंडीत पकडले आहे. या सर्व बंडोबांना थंडोबा करण्यासाठी विविध कसरती सुरू आहेत. तर कुणाला पक्षशिस्तीचा बडगाही दाखविला जात आहे. दुसरीकडे विविध समाजाच्या बैठका वेगाने सुरू असून, समाजातील दोन उमेदवारांपैकी एकाने माघार घेण्याबाबत दबावही टाकला जात आहे. या पृष्ठभूमीवर मैदानात कोण कायम राहणार, याचा निर्णय सोमवार, ७ सप्टेंबर रोजी होत आहे. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत कोणते बंडोबा थंडोबा झाले, हे स्पष्ट होईलच.अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेस नेते मदन भरगड यांनी ‘वंचित’ची उमेदवारी घेतल्यामुळे त्यांची उमेदवारी कायम राहीलच. भाजपाचे सदस्य डॉ. अशोक ओळंबे यांचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज वैध ठरला आहे. त्यांना भाजपाने पक्षातून निलंबित केले आहे. भाजपमध्ये ओळंबे हे पालकमंत्री गटाचे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांची उमेदवारी पालकमंत्र्यांच्या निर्देशावरून मागे घेतली जाते का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. बाळापूर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण गव्हाणकर व भारिपचे गजानन दांदळे यांच्या उमेदवारीबाबत रविवारी समाजाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या बैठकीतील निर्णयावर या दोन्ही उमेदवारांच्या लढतीची तीव्रता ठरणार आहे. अशीच स्थिती बळीराम सिरस्कार व डॉ. संतोष हुशे यांची आहे. अकोला पूर्व या मतदारसंघातून ‘वंचित’चे नेते व माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे हे रिंगणात कायम राहिले तर येथे आजी आमदाराला दोन माजी आमदारांचे आव्हान ठरेल. मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपचे बंडखोर राजकुमार नाचणे यांनी प्रहार जनशक्ती संघटनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविली आहे. त्यामुळे ते कायम राहण्याचे संकेत आहेत. ‘वंचित’चे बंडखोर सम्राट डोंगरे, अकोटमधील सेनेचे बंडखोर अनिल गावंडे यांच्याही उमेदवारीकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. या सर्व बंडोबांना रोखण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न होत आहेत. सोमवारी दुपारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत यामधील काही बंडोबा थंड झाले, तर संभाव्य मत विभाजन टळेल, अन्यथा सर्वच मतदारसंघांत चुरशीच्या लढती आणखी तीव्र चुरसमध्ये बदलतील.

१४२ उमेदवारी अर्ज वैधजिल्ह्यातील पाच मतदारसंघांमध्ये छाननीअंती १०१ उमेदवारांचे १४२ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, ७ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या लढतीचे चित्र सोमवारी दुपारनंतर निश्चित होणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण