शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra cabinet expansion : अकोला जिल्हा मंत्रिपदापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 14:17 IST

अकोल्याची पाटी कोरीच राहिल्याने नव्या वर्षात अकोल्याला आयात पालकमंत्री मिळेल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

- राजेश शेगोकार

अकोला : २०१९ या सरत्या वर्षाने राजकारणात मोठी उलथापालथ घडविली. शिवसेना, काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस असे तीन भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र आल्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. या सरकारचा मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार सोमवारी झाला. यामध्ये अकोल्याची पाटी कोरीच राहिल्याने नव्या वर्षात अकोल्याला आयात पालकमंत्री मिळेल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.अकोल्यातील पाचपैकी चार जागा भाजपने जिंकलेल्या असून, शिवसेनेने बाळापूर ही एकमेव जागा जिंकली आहे. शिवसेनेचे आ. गोपीकिशन बाजोरिया हे सर्वात ज्येष्ठ आमदार असून, त्यांचे पुत्र विल्पव हे सुद्धा हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेवर आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सेनेचे तीन आमदार आहेत. बाजोरिया हे मंत्रिपदासाठी शिवसेनेत सर्वाधिक प्रबळ दावेदार आहेत. ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी असल्याने पश्चिम वºहाडातील तीनही जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करतात तसेच त्यांची मातोश्रीसोबत असलेली जवळीक लक्षात घेता त्यांची वर्णी लागेल, अशी अपेक्षा होती. शिवसेनेच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात नव्या नेतृत्वालाही संधी देण्याचे सूतोवाच केले होते. त्या अनुषंगाने पहिल्यांदाच विजयी झालेले आमदार नितीन देशमुख यांनाही संधी मिळण्याची आशा त्यांच्या समर्थकांना होती; मात्र सोमवारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अकोल्याची पाटी कोरीच राहिली आहे. विशेष म्हणजे आ. बाजोरिया यांनी शपथविधी सोहळ्याला दांडी मारून बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमुलकर, आ. संजय गायकवाड यांच्या समवेत शपथविधीचा सोहळा दूरचित्रवाणीवर बघितला. त्यावरून पश्चिम वºहाडातील आमदारांची नाराजी स्पष्ट झाली आहे. बच्चू कडू यांच्यावर येऊ शकते पालकत्वाची जबाबदारीशिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झालेले आमदार बच्चू कडू यांच्यावर अकोल्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी येण्याची शक्यता राजकीय वर्तृळात व्यक्त केली जात आहे. बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्याचे असून, तेथील आमदार यशोमती ठाकूर यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. साहजिकच त्या अमरावतीच्या पालकमंत्री पदावर राहतील त्यामुळे ना. कडू यांना नजीकच्या अकोल्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. ना. कडू यांची प्रहार संघटना अकोल्यातही प्रभावी असून, जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणातही उतरलेली आहे. त्यामुळे ना. कडू यांनाही अकोला रजाकीय दृष्टीने सोयीचे ठरण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाShiv Senaशिवसेनाministerमंत्री