शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

महाराष्ट्र बजेट 2020 : नरनाळा, असदगडसाठी ९४ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 11:41 IST

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2020

ठळक मुद्दे किल्ले नरनाळा आणि असदगड विकास कामाला चालना मिळणार आहे.प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी असदगड किल्ला आणि परिसराची पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात अकोट तालुक्यातील किल्ले नरनाळा आणि अकोला शहरातील असदगड विकास कामांसाठी ९४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये नरनाळा ८१ कोटी तर असदगड विकास कामांसाठी १३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेच्या प्रारूप आराखड्यांना अंतिम मान्यता देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी गत २८ जानेवारी रोजी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. जिल्हा नियोजन समितीच्या मागणीनुसार अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील किल्ले नरनाळा पर्यटन विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते.त्यानंतर शुक्रवार, ६ मार्च रोजी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील किल्ले नरनाळा पर्यटन विकासासोबतच अकोला शहरातील असदगड किल्ल्याच्या विकास कामासाठी ९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामध्ये नरनाळा पर्यटन विकास कामासाठी ८१ कोटी रुपये आणि असदगड विकास कामासाठी १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील किल्ले नरनाळा आणि असदगड विकास कामाला चालना मिळणार आहे.

जिल्हा प्रशासन सादर करणार शासनाकडे प्रस्ताव!जिल्ह्यातील नरनाळा व असदगड कि ल्ल्याच्या विकास कामांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात ९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने किल्ले नरनाळा व असदगड विकास कामांचा प्रस्ताव पालकमंत्र्यांच्या मान्यतेने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लवकरच शासनाकडे सादर करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी केली असदगडांची पाहणी!राज्याच्या अर्थसंकल्पात किल्ले नरनाळा आणि असगड विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला. या पृष्ठभूमीवर शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला शहरातील असदगड किल्ला आणि परिसराची पाहणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार व तहसीलदार विजय लोखंडे उपस्थित होते.

टॅग्स :AkolaअकोलाNarnala Fortनरनाळा किल्लाMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेटAsadgad Fortअसदगड किल्ला