शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

महाराष्ट्र बजेट 2020 : खारपाणपट्टा दुर्लक्षित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 4:13 PM

महाराष्ट्र बजेट 2020

- राजरत्न सिरसाटअकोला: खारपाणपट्ट्यातील अल्कधर्मी व खाऱ्या पाण्याच्या सेवनामुळे पशुधन आणि कोंबड्यांना गंभीर स्वरू पाचे आजार होत असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. मानवी आरोग्यवरही विपरीत परिणाम होत असून, खारे पाण्यात शेती व्यवसायही करणे कठीण झाले आहे. यावर संशोधन होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि ‘एमसीईएआर’ने स्वतंत्र खारपाणपट्टा संशोधन केंद्राचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. तथापि, याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असून, यावर्षीच्या अर्थसंकल्पातही दुर्लक्ष करण्यात आले आहे.वºहाडातील पूर्णा नदीच्या पूर्व व पश्चिम अशा दोन्ही भागांनी साधारणत: ४० ते ५० किलोमीटर रुंद व १५५ कि.मी. लांब खारपाणपट्टा आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यांतील १६ तालुक्यांतील ८९२ गावे या खारपाणपट्ट्यात मोडतात. सुमारे तीन लाख हेक्टरचे हे क्षेत्र आहे. खारपाणपट्ट्यातील माती चोपण असून, पिण्याचे पाणी खारे आहे. या पाण्यात अनेक प्रकारचे क्षार असल्याने कृषी माल उत्पादनावर त्याचा परिणाम तर होतोच, मानवी आरोग्यालाही हे पाणी घातक असल्याने वर्षानुवर्षे त्याचे दुष्परिणाम या भागातील जनता सहन करीत आहे. उत्पादन कमी होत असल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या एकूण सामाजिक व आर्थिक स्तरावर झालेला आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या खारपाणपट्ट्यावर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र केंद्र या विद्यापीठात देण्यात यावे, या मागणीचा प्रस्ताव डिसेंबर २०१३ व जानेवारी २०१५ तसेच २१०६ आणि २०१८ मध्ये भारतीय कृषी संशोधन व महाराष्टÑ कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे पाठविला होता. खारपाणपट्ट्यात जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश करण्यास तत्कालीन कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलेल्या सूचनांचाही अंतर्भाव करण्यात आला; पण अद्याप कृषी विद्यापीठाला स्वतंत्र खारपाणपट्टा संशोधन केंद्र मंजूर झाले नाही. एमसीईएआरनेही या प्रस्तावाची दखल घेत, त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले होते. तथापि, यावर्षीच्या अर्थसंकल्पात सपशेल दुर्लक्ष करण्यात आल्याने खारपाणपट्ट्यातील शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 मत्स्य व्यवसायावर भर!अर्थसंकल्पात खारे पाणी, मत्स्य व्यवसायावर भर देण्यात आला आहे; परंतु या भागातील पाऊस अनिश्चित असल्याने पावसाच्या पाण्याची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय, शेती करावी कशी, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट