शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

गांधी रोडवरील महाराष्ट्र बँकेतून पाच लाखांची रोकड पळविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र बँकेच्या गांधी रोडवरील शाखेतून बुधवारी भरदिवसा पाच लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. विशेष म्हणजे, बँकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना सायंकाळपर्यंत बँकेतून पाच लाख चोरी गेल्याचे सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान लक्षात आले.गांधी रोडवर बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये बुधवारी सकाळी ११ वाजता सर्व ...

ठळक मुद्देसकाळी घडलेली चोरी सायंकाळी उघडमहाराष्ट्र बँकेच्या गांधी रोडवरील शाखेतून रोकड पळविल्याची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र बँकेच्या गांधी रोडवरील शाखेतून बुधवारी भरदिवसा पाच लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. विशेष म्हणजे, बँकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना सायंकाळपर्यंत बँकेतून पाच लाख चोरी गेल्याचे सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान लक्षात आले.गांधी रोडवर बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये बुधवारी सकाळी ११ वाजता सर्व कर्मचारी नेहमीप्रमाणे बँकेच्या कामात व्यस्त होते. काही वेळातच बँकेच्या इतर ग्राहकांसोबतच तीन व्यक्तीदेखील बँकेत पोहोचले. या तिघांनी बँकेतील कर्मचार्‍यांच्या काउंटरवर भेट देऊन कर्मचार्‍यांना व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न केला. कर्मचारी व अधिकारी व्यस्त असल्याचे निदर्शनास येताच त्यांचाच साथीदार असलेला चौथा व्यक्ती बँकेच्या आतमध्ये आला. त्याने थेट रोकड विभागात प्रवेश केला. रोकड विभागातील पाच लाख रुपयांची रोकड बॅगेत टाकू न पळ काढला. महाराष्ट्र बँकेच्या रोकड विभागात जाऊन त्यामधील पाच लाख रुपयांची रोकड घेऊन एक चोर सर्वांचे लक्ष चुकवून निघून गेल्याने एकाही बँक अधिकारी व कर्मचार्‍याच्या लक्षात न आल्याने पोलीसही अवाक् झाले आहेत. बुधवारी सायंकाळी बँकेचे कामकाज आटोपल्यानंतर कॅश विभागाचे कर्मचारी नियमाप्रमाणे रोकड मोजत असताना यामध्ये तब्बल पाच लाख रुपये कमी असल्याचे दिसून आले. बँकेच्या व्यवस्थापकाने  तत्काळ सिटी कोतवाली पोलिसांना या चोरीची माहिती दिली. महाराष्ट्र बँकेत भरदिवसा चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला असता तपासामध्ये बॅँक अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे हा चोरीचा प्रकार घडल्याचे समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल जुमळे यांनी सांगितले की, भरदिवसा गांधी रोडवरील वर्दळीच्या महाराष्ट्र बँकेत चोरी होणे, हा प्रकार बँक कर्मचारी व अधिकार्‍यांचा निष्काळजीपणा असल्याचे दिसून येत आहे. सीसी कॅमेर्‍याच्या फुटेजमध्ये चोरट्याचा हा प्रकार कैद झाला आहे. 

सीसी क ॅमेर्‍यामध्ये चोर कैदबँकेमध्ये शिरून रोकड विभागात प्रवेश करून पाच लाखांची रोकड पळविणारा चोरटा अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नजरेतून सुटला; मात्र तो सीसी कॅमेर्‍याच्या फुटजेमध्ये स्पष्ट दिसला आहे. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर सीसी कॅमेर्‍याचे फुटेज तपासताच या चोरट्याचा चेहरा समोर आला असून, त्याला लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती आहे.