शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Maharashtra Assembly Election 2019 : तीन मतदारसंघांत मतांचा टक्का वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 10:24 IST

वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रणशिंग फुंकल्यामुळे पाचही मतदारसंघांत कडवी झुंज पाहावयास मिळणार आहे.

- आशिष गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बाळापूर, अकोट, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात मतांची टक्केवारी वाढल्याचे समोर आले आहे. त्या तुलनेत अकोला पश्चिम मतदारसंघात एक टक्क्याने तर अकोला पूर्व मतदारसंघात अवघ्या ०.१ टक्क्याने घट झाली आहे. अकोला पश्चिम मतदारसंघात टक्केवारीची घसरण लक्षात घेता त्याचा कोणत्या पक्षाच्या उमेदवारावर परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान, विधानसभा निवडणुकीमध्ये यंदा प्रथमच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रणशिंग फुंकल्यामुळे पाचही मतदारसंघांत कडवी झुंज पाहावयास मिळणार आहे.चौदाव्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी बाळापूर, अकोट तसेच मूर्तिजापूर मतदारसंघात उमेदवारी निश्चित होण्यापूर्वीपासूनच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे चित्र होते. प्रबळ दावेदार आणि इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे या मतदारसंघात निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांसमोर आव्हान ठाकले होते. २१ आॅक्टोबर रोजी पाचही विधानसभा मतदारसंघांत शांततेत व उत्साहात मतदान पार पडले.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा बाळापूर मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाल्याची नोंद असून, गतवेळच्या निवडणुकीत ५९.९६ टक्के मतदान झाले होते. यंदा ६५.८९ टक्के मतदान झाले असून, मतांच्या टक्केवारीत सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवेळी अकोट मतदारसंघात ६०.७१ टक्के मतदान झाले होते. सोमवारी मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर ६३.८३ टक्के मतदान झाल्याचे समोर आले. अर्थात, २०१४ च्या तुलनेत तीन टक्क्यांनी मतदान वाढल्याचे दिसून येते. मूर्तिजापूर मतदारसंघातही गतवेळच्या तुलनेत दीड टक्क्यांनी वाढ होऊन ५४.४२ टक्के मतदान झाल्याचे समोर आले. मतांची वाढलेली टक्केवारी नेमकी कोणत्या उमेदवाराच्या पथ्यावर पडते आणि कोणाचे पत्ते कट होते, ही बाब २४ आॅक्टोबर रोजी निकालाअंती समोर येणार असल्यामुळे जिल्हावासीयांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

अकोला पूर्व, पश्चिममध्ये घटअकोला पूर्व मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत ५५.७८ टक्के मतदान झाले होते. यंदा ५५.७७ टक्के मतदान झाले. अर्थात, या मतदारसंघात अवघ्या ०.१ टक्क्याने घट झाली आहे. अकोला पश्चिम मतदारसंघात गतवेळी ५१.५७ टक्के मतदान झाले होते. यंदा ५०.८२ टक्के झाले. मतांचा घसरलेला एक टक्का लक्षात घेता, त्याचा कोणत्या पक्षाला फायदा होतो अन् कोणाचे नुकसान होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘वंचित’मुळे अनेकांची समीकरणे बिघडणारअ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यंदा प्रथमच संपूर्ण राज्यात वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग राबवत दमदार उमेदवारांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले. एमआयएमसोबत दुरावा झाल्यानंतरही ‘वंचित’च्या उमेदवारांनी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात प्रतिस्पर्धी उमेदवारांना कडवी झुंज दिल्याचे चित्र आहे. ‘वंचित’च्या प्रयोगामुळे अनेकांची समीकरणे बिघडण्याची चिन्ह आहेत.

महिलांचा टक्का घसरला!पाच विधानसभा मतदारसंघात १५ लाख ७७ हजार ४७६ मतदारांची नोंद झाली. यापैकी ९ लाख ११ हजार ८१५ मतदान झाले. यामध्ये ४ लाख ९७ हजार १३५ पुरुष (६१.०९ टक्के), तर ४ लाख १४ हजार ६६९ महिलांचा (५४.३० टक्के) समावेश आहे. यात महिलांचा टक्का वाढला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019akola-west-acअकोला पश्चिमakola-east-acअकोला पूर्वakot-acअकोटbalapur-acबाळापूरmurtizapur-acमूर्तिजापूर