शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत कर्जमाफी! - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 18:52 IST

मूर्तिजापूर : शासनाने सुरु केलेली पिक कर्ज माफी योजना जो पर्यंत शेवटचा शेतकरी पुर्ण कर्ज मुक्त होत नाही तोपर्यंत सुरुच ठेवणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मूर्तिजापूर येथे केले.

मूर्तिजापूर : शासनाने सुरु केलेली पिक कर्ज माफी योजना जो पर्यंत शेवटचा शेतकरी पुर्ण कर्ज मुक्त होत नाही तोपर्यंत सुरुच ठेवणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मूर्तिजापूर येथे केले. ते येथील ६ आॅगस्ट रोजी  महाजनाआदेश यात्रेनिमित्त जमलेल्या समुदाया समोर बोलत होते. ते  पुढे म्हणाले की, आतापर्यंत आपण अनेक देवांच्या यात्रा बघितल्या परंतू ही यात्रा खºया देवाची म्हणजे जनतेची, मतदारराजाची आहे.या निमित्ताने मी तुमचा आशिर्वाद घेण्यासाठी तुमच्या पर्यंत पोहोचलो आहे. ही सरकार बेदाग असून संपूर्णपणे पारदर्शक आहे. आम्ही पाच वर्षाच्या काळात कोणत्याही संस्था तथा आमचे साम्राज्य उभे केले नाही. आम्ही पाच वर्षांत शेतकºयांसाठी ५० हजार कोटी रुपये खर्च केले. म्हणजे पाच वर्षांत १० हजार कोटी रुपये दिले. त्यांनी पंधरा वर्षांत केवळ २० हजार कोटी दिले. दिल्याचे सांगत तत्कालीन सरकारचा समाचार घेतला. खºया अर्थाने आमचे सरकार शेतकºयांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असुन शेतकºयांना काळजी करण्याचे कारण नाही अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली.जनतेचा सेवक म्हणून लोकशाहीतील मालक जनता जनार्दनाला कामकाजाचा हिशेब देणे कर्तव्य असल्यामुळे महाजनादेश यात्रा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  यावेळी ना. डॉ. रणजीत पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना बॅरेजचा प्रश्न उपस्थित केला. बॅरेजचे  काम पुर्णत्वास गेले तर  शेतकºयांना सिंचनासाठी उपयोग होईल. असे सांगत मुख्यमंत्र्यांचे रखडलेल्या कामाकडे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाला ना. संजय कुटे, ना. रणजीत पाटील, आमदार हरिश पिंपळे, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, डॉ. अमित कावरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)

'प्रहार' कार्यकर्त्यांना केले पोलीसांनी स्थानबद्ध प्रहार पक्षाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्याना निवेदन देऊन घोषणाबाजी करणार असल्याची  कुणकुण पोलीसांना लागली असता कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वीच पोलीसांनी त्यांना स्थानबद्ध केले. यामध्ये तालुका अध्यक्ष संतोष इंगोले, शहर अध्यक्ष सागर फुंडकर, अमोल वानखडे, अंकुश हरणे, पुरुषोत्तम ठोकळ यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर