शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

महाबीजला ७० कोटींचा नफा,  देशातील सर्वच बियाणे महामंडळाला टाकले मागे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 10:17 IST

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) बियाण्यात सदोषता आढळत असल्याचा काही शेतक-यांनी आरोप केला आहे

राजरत्न सिरसाट

अकोला, दि. 20 : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) बियाण्यात सदोषता आढळत असल्याचा काही शेतक-यांनी आरोप केला आहे. परंतु हे महामंडळ राज्यातील शेतक-यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आल्यानेच महामंडळाची उत्तरोतर प्रगती होत असल्याचे महाबीजच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. महाबीजच्या विश्वासार्हतेमुळे संस्था नफ्यात असून, गतवर्षीसुध्दा ७० कोटी रुपये नफा झाला आहे. यावर्षीही ७२५ कोटी ३५ लाख रुपयांचा बियाणे विक्रीचा व्यवसाय केला आहे. देशातील सर्वच बियाणे महामंडळाला याबाबतीत महाबीजने मागे टाकले आहे. आता महाबीजची तुलना राष्ट्रीय बियाणे महामंडळासोबत केली जात आहे. शासनाच्या निर्देशानुसार अनुदानावर बियाणे वाटप करणाºया महाबीजने शेतकºयांना दिलासा दिला आहे. खासगी कंपन्यांच्या बियाणे दराच्या स्पर्धेत शेतकºयांना दिलासा देण्यासाठी नवे बियाणे संशोधन केले आहे.राज्यातील शेतकºयांना दर्जेदार व किफायतशीर बियाणे उपलब्ध होण्यासाठी २८ एप्रिल १९७६ रोजी महाबीजची स्थापना करण्यात आली आहे. खासगी कंपन्यांच्या वाढीव बियाणे दरावर यामुळे काही प्रमाणात अंकुश लागला आहे. राज्यातील शेतकºयांच्या गरजेनुसार हवामानातील बदलाला पुरक उच्च दर्जाचे संकरित व सुधारित संशोधित वाण विकसित करू न दिले आहे. याच उद्देशाने १९९२ मध्ये महामंडळाने संशोधन व विकास विभागाची स्थापना केली आहे. आतापर्यंत संकरित ज्वारी, सूर्यफूल, कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद व भाजीपाला या पिकांच्या संशोधनास प्राधान्य दिले असून, शेतकºयांना हे बियाणे उपलब्ध करू न दिले आहे. यामध्ये संकरित ज्वारी महाबीज -७, मूग- उत्कर्षा, संकरित बाजरी महाबीज - १००५, संकरित मका उदय हे वाण भारत सरकारने अधिसुचित केले आहेत. तसेच संकरित कपाशी वाणामध्ये बी.टी. जनूक टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. संकरित कपाशी पीकेव्ही हाय-२, बीजी-२ व एनएचएच-४४, बीजी-२ या वाणांना कृषी विभाग व भारत सरकारने मराठवाडा विभागाकरिता कोरडवाहू लागवडीस नुकतीच मान्यता दिली आहे. यातील पीकेव्ही हाय-२ व वरील इतर वाणांची संपूर्ण राज्यात लागवड करण्याकरिता कृषी विभाग व भारत सरकारकडे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.महाबीजने आंतरराष्टÑीय पीक उष्ण कटिबंधीय पीक संशोधन संस्थेसोबत (आयसीआरआयएसएटी) करार करू न ज्वारी, बाजरी या पिकांमध्ये नवीन संशोधित वाण निर्मितीचे काम सुरू आहे. मक्याचे उत्कृष्ट संकरित वाण देण्यासाठी महाबीजने आंतरराष्टÑीय मका आणि गहू विकास केंद्र हैदराबाद (सीआयएमएमवायटी) या संस्थेसोबत करार केला आहे. वाण निर्मितीचे काम येथे प्रगतीपथावर आहे. खासगी कंपन्यांसोबत सुद्धा याबाबतचे करार करण्यात आले आहेत.- उती संवर्धन दोन लाख केळी रोपांचे लक्ष्यांकसध्या जैवतंत्रज्ञानाचे युग असल्याने महाबीजने यावर भर दिला असून, राज्यातील शेतकºयांना फळवर्गीय पिकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विकसित उती संवर्धित केळी ग्रॅडनैन रोपांची निर्मिती केली आहे. ही रोपे २००३ पासून महाबीजकडे उपलब्ध आहेत. याकरिता विदर्भ वैधानिक विकास महामंडळाने अनुदान दिले आहे.भारत सरकारनेही प्रयोगशाळा बळकटीकरणासाठी निधी दिला आहे. यावर्षी या माध्यमातून १.५ ते २ लाख केळी रोपे उत्पादनाचे लक्ष्यांक आहे. त्यासाठीचे वितरण सुरू करण्यात आले आहे. भुसावळ येथे १० लाख रोपे उत्पादन क्षमता असलेली प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे. किफायतशीर दरात विषाणूरहीत रोपे पुरविण्याचे हे नियोजन आहे. तसेच २२ प्रकारच्या वृक्षाच्या प्रजातीचे रोपे या तंत्रज्ञानाद्वारे निर्मित करण्यात येत आहेत.

-गुणवत्ता कक्ष विभाग - बियाणे कायदा १९६६ नुसार बियाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी महामंडळाच्या अकोला व परभणी, श्रीरामपूर व जालना येथे अद्ययावत गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. २०१२ पासून बीज प्रामाणिकरण यंत्रणेने प्रमाणित केलेल्या संपूर्ण पायाभूत व प्रमाणित लॉटच्या सोयाबीन बियाण्यांची क्षेत्रीय उगवण चाचणी सुरू केली आहे. चाचणीमध्ये पात्र झालेले बियाणेच बीजोत्पादन व विपणनाकरिता उपलब्ध करू न देण्यात आले आहे.

- एक हजार क्ंिवटल बियाणे वापरले नाही!खरीप २०१७ च्या या हंगामात बीज प्रामाणिकरणामध्ये पात्र असूनही महाबीजच्या क्षेत्रीय चाचणीत अपात्र ठरलेले जवळपास एक हजार क्ंिवटल सोयबीन बियाणे बीजोत्पादन व विपणनाकरिता वापरली नाहीत.

राज्यात लागणा-या एकूण बियाण्यांपैकी महाबीजचे ४० टक्के बियाण्यांनाचा विक्रीत हिस्सा आहे. त्या अनुषंगाने लागणाºया बियाण्यांचा आढावा घेण्यात आला आहे. कृषी आयुक्तालय व महाबीजच्या संयुक्त सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. तो दरवर्षी घेण्यात येत असून, यावर्षी पुढील तीन वर्षात लागणाºया १२५ टक्के एवढा विविध पीक वाणाचा बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येतो.

- महाबीज बियाण्यांचे वितरणमहाबीजच्या बियाण्यांची २०१२ मध्ये ६ लाख ९ हजार ६०३ क्ंिवटल विक्री झाली होती, २०१३ मध्ये ७ लाख ३३ हजार ५०० क्ंिवटल, २०१४ मध्ये २ लाख ५५ हजार ९२९ क्ंिवटल, २०१५ मध्ये ४ लाख ७४ हजार ५८७ क्ंिवटल, तर २०१६ मध्ये ५ लाख १५ हजार १९२ क्ंिवटल बियाण्यांची विक्री झाली आहे.

- महाबीजची वार्षिक उलाढाल!महाबाजची वार्षिक उलाढाल पावसावर अवलंबून असून, मागील पाच वर्षांतील आकडेवारीकडे बघितल्यास २०१२-१३ मध्ये ५१३.१३ कोटी वार्षिक उलाढाल झाली होती. तसेच २०१३-१४ मध्ये ५३२.५१ कोटी, २०१४-१५ ची उलाढाल ३४१.५० कोटी, २०१५-१६ मध्ये ४७२.१४ कोटी रुपये, २०१६-१७ मध्ये ६४४.६६ कोटी, तर चालू २०१७-१८ यावर्षी ७२५.३५ कोटी रुपयांची बियाणे विक्रीची उलढाल झाली आहे. प्रत्येकवर्षी महाबीजला नफा झाला आहे. मागील वर्षी हा नफा ७० कोटी एवढा होता.

- राजकीय हस्तक्षेप नाही!महाबीजचे कामकाज प्रशासकीय स्तरावर चालत असून, कृषीचे प्रधान सचिव महाबीजचे अध्यक्ष आहेत. सचिव कृषी आयुक्त, तर व्यवस्थापकीय संचालक म्हणून भारतीय प्रशासन सेवेतील सनदी अधिकारी (आयएएस) काम पाहतात. महामंडळाच्या कामकाजात थेट राजकीय हस्तक्षेप नसलेले देशातील हे पहिले महामंडळ आहे. संस्थेचे संपूर्ण राज्यात शेतकरी सभासद आहेत. नफ्यातूनच विकास करावा लागत असल्याने संस्थेवर सर्वांना बारकाईने नजर ठेवावी लागते, हे विशेष .- महाबीजची स्थापनाच राज्यातील शेतकºयांचे हित डोळ््यासमोर ठेवून करण्यात आली आहे. किफायतशीर व दर्जेदार बियाणे उपलब्ध करू न देण्याची जबाबदारी आमची आहे. म्हणूनच शेतकºयांचा विश्वास प्राप्त केला आहे. २०१६-१७ मध्ये ७० कोटींवर नफा मिळाला आहे. शेतकºयांना विविध पिकांचे भरघोस उत्पादन देणाºया वाणांची निर्मिती केली आहे.ओमप्रकाश देशमुख,व्यवस्थापकीय संचालक,महाबीज, अकोला.