शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठीच महाबीजचा व्यवसाय - एकनाथ डवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 1:44 PM

नफ्या-तोट्याच्या ताळेबंदाऐवजी सहकाराची भावना महत्त्वाची आहे. त्यासाठीच महाबीज कार्यरत आहे. पुढे जाण्यासाठीही हाच दृष्टिकोन ठेवावा लागणार आहे, असे महाबीजचे अध्यक्ष तथा राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी येथे सांगितले.

अकोला: उत्पादन करणारे शेतकरी, खरेदी करणारेही शेतकरीच, त्यामुळे या दोघांचे हित जोपासण्यासाठीच महाबीजला व्यावसायिक दृष्टिकोन ठरवावा लागतो. त्यासाठी नफ्या-तोट्याच्या ताळेबंदाऐवजी सहकाराची भावना महत्त्वाची आहे. त्यासाठीच महाबीज कार्यरत आहे. पुढे जाण्यासाठीही हाच दृष्टिकोन ठेवावा लागणार आहे, असे महाबीजचे अध्यक्ष तथा राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी येथे सांगितले.कृषी विद्यापीठातील ठाकरे सभागृहात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या सदस्यांच्या आमसभेत अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी खासदार, महाबीजचे संचालक अ‍ॅड. खासदार संजय धोत्रे, संचालक वल्लभराव देशमुख, शेतकरी तज्ज्ञ संचालक अर्चना चोरे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी, भागधारक आमदार रणधीर सावरकर, अमरावती कृषी विभागाचे सहसंचालक सुभाष नागरे, कृषी विद्यापीठाचे डॉ. खर्चे, महाबीजचे पुंडकर उपस्थित होते.पुढे बोलताना डवले यांनी शासन निर्मित महाबीज ही संस्था बाजारातील स्पर्धेला तोंड देऊनही नफ्यात आहे. त्याचवेळी इतर संस्था तोट्यात आहेत. त्याचे कारण म्हणजे, महाबीजने सुरुवातीपासूनच अंगीकारलेला शेतकरी विकासाचा दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे सांगितले. सभासदांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचे समाधान त्यांनी केले. त्यामध्ये गेल्या वर्षी बियाणे उत्पादकांना किमान आधारभूत किंमत आणि बाजारभाव यातील फरकाची रक्कम देण्याचा विचार निश्चित केला जाईल. बियाणे नमुने फेल होण्याच्या पद्धतीत सुधारणा केली जाईल. त्यासाठी नमूने घेण्याची पद्धत नव्याने ठरवली जाईल. उत्पादकांना मोबदला तातडीने मिळण्यासाठी व्यवस्थेत बदल करण्यासाठी संगणकीकरण करणे, आपत्तीमध्ये बियाणे उत्पादकांना भरपाई मिळण्यासाठी पीक विम्याच्या पर्यायाची तयारी ठेवणे, उत्पादकांना सर्वच प्रक्रियेबाबत मेसेंजिंग प्रणाली विकसित केली जाईल. महाबीजच्या प्रत्येक प्लँटवर सीसी कॅमेरे तातडीने लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी संचालक देशमुख यांनी शेतकºयांच्या मागण्या, अपेक्षांवर निर्णय घेण्याची मागणी केली. व्यवस्थापकीय संचालक भंडारी यांनी विविध मुद्यांवर माहिती दिली.

काळानुसार बदला- धोत्रेमहाबीजचा विक्रेता आणि ग्राहक एकच शेतकरी आहे. त्यामुळे महाबीजच्या सुरुवातीपासूनच यंत्रणा आणि शेतकºयांचे जिव्हाळ््याचे नाते होते. ते आता पूर्वीसारखे राहिले नाही. काळानुसार बदल झाला तरी माणूस म्हणून एकमेकांशी समन्वय हवा, अधिकारी-कर्मचाºयांनी तो आताही ठेवायलाच हवा. समस्या छोटी असतानाच दुर्लक्ष केल्यास ती गंभीर होते, याकडे खासदार तथा संचालक अ‍ॅड. खासदार संजय धोत्रे यांनी लक्ष वेधले. 

 

टॅग्स :MahabeejमहाबीजAkolaअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रे