शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘मोबाइल अ‍ॅप’द्वारे मिळणार ‘महाबीज’चे अनुदानावरील हरभरा बियाणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 11:10 IST

Mahabeej, Agriculture, Akola राज्यात ६५ हजार क्विंटल हरभºयाचे बियाणे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले.

- संतोष येलकर

अकोला: यंदाच्या रब्बी हंगामात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामार्फत (महाबीज) शेतकऱ्यांना ‘मोबाइल अ‍ॅप’द्वारे अनुदानावरील हरभरा बियाणे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यात ६५ हजार क्विंटल हरभºयाचे बियाणे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले असून, अनुदानावरील हरभरा बियाणे ‘मोबाइल अ‍ॅप’द्वारे वाटप करण्याचा पथदर्शी प्रकल्प महाबीजकडून पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे.शासनाच्या अनुदानावरील बियाणे वाटप योजनेत राज्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर हरभरा बियाणे वाटप करण्यासाठी दरवर्षी कृषी विभागामार्फत शेतकºयांना परमीटचे वाटप करण्यात येते. कृषी विभागाने दिलेल्या परमीटवर बियाणे विक्रेत्यांकडून शेतकºयांना अनुदानावर महाबीजचे बियाणे वाटप करण्यात येत होते. यावर्षीच्या रब्बी हंगामात मात्र अनुदानावरील महाबीजचे हरभरा बियाणे घेण्यासाठी शेतकºयांना कृषी विभागाच्या ‘परमीट’ची गरज भासणार नाही. राज्यातील शेतकºयांना अनुदानावरील हरभरा बियाणे मोबाइल अ‍ॅपद्वारे वितरित करण्यासाठी ‘महाबीज’ने बियाणे विक्रेत्यांकडे ‘मोबाइल अ‍ॅप’ उपलब्ध करून दिले आहे. या ‘अ‍ॅप’द्वारे शेतकºयांना अनुदानावरील हरभरा बियाणे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामासाठी राज्यातील शेतकºयांना अनुदानावर ६५ हजार क्विंटल हरभरा बियाणे वाटप करण्याचे नियोजन महाबीजने नियोजन केले असून, रब्बी हंगामात मोबाइल अ‍ॅपद्वारे अनुदानावरील बियाणे वाटपाचा पथदर्शी प्रकल्प यावर्षी पहिल्यांदाच ‘महाबीज’कडून राबविण्यात येत आहे.शेतकºयांना द्यावा लागेल सात-बारा, आधार क्रमांक!शेतकºयांना मोबाइल अ‍ॅपद्वारे अनुदानावरील हरभरा बियाणे वाटपात शेतकºयांना सात-बारा व आधार क्रमांकाची झेरॉक्स संबंधित बियाणे विक्रेत्यास द्यावी लागणार आहे. सात-बारा व आधार क्रमांकाची झेरॉक्स दिल्यानंतर विक्रेत्याकडून शेतकºयांना अनुदानावरील हरभरा बियाणे वितरित होणार आहे.यावर्षीच्या रब्बी हंगामात राज्यातील शेतकºयांना अनुदानावरील हरभरा बियाणे मोबाइल अ‍ॅपद्वारे वाटप करण्याचा पथदर्शी प्रकल्प ‘महाबीज’कडून राबविण्यात येत असून, मोबाइल अ‍ॅपद्वारे बियाणे वाटप सुरू करण्यात आले आहे. राज्यात अनुदानावर ६५ हजार क्विंटल हरभरा बियाणे वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.- अजय कुचेमहाव्यवस्थापक (विपणन), महाबीज, अकोला.

 

टॅग्स :MahabeejमहाबीजAkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र